शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खेळातून सर्वांगीण विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 06:00 IST

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच खेळाविषयी आवड निर्माण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे लक्ष द्यावे. पुढे क्रीडा व मैदानाकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले. याप्रसंगी अजय कंकडालवार व भास्कर तलांडे यांनी खेळ व शिक्षणाचे महत्त्व सांगितले.

ठळक मुद्देधर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन । आलापल्लीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : शिक्षणासोबतच खेळ अत्यावश्यक असून खेळातून विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास साधावा, असे प्रतिपादन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. आलापल्लीच्या क्रीडा संकुलात शनिवारी तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक संम्मेलनात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार होते. विशेष अतिथी म्हणून पं.स. सभापती भास्कर तलांडे, उपसभापती गीता चालूरकर, प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य अजय नैताम, पं. स. सदस्य हर्षवर्धनरावबाबा आत्राम, सुरेखा आलाम, शीतल दुर्गे, आलापल्लीच्या सरपंच सुगंधा मडावी, उपसरपंच पुष्पा अलोने, लक्ष्मण येरावार, कैलास कोरेत, पराग पांढरे, सलीम शेख उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच खेळाविषयी आवड निर्माण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे लक्ष द्यावे. पुढे क्रीडा व मैदानाकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले. याप्रसंगी अजय कंकडालवार व भास्कर तलांडे यांनी खेळ व शिक्षणाचे महत्त्व सांगितले.तत्पूर्वी धर्मरावबाबा आत्राम यांनी क्रीडाध्वज फडकवून क्रीडा व ज्योत पेटवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी महागाव, वेलगूर, आलापल्ली, इंदाराम, छल्लेवाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती नृत्य सादर केले.शिक्षकांच्या वतीने धर्मरावबाबा आत्राम आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, संचालन शैलजा गोरेकर तर आभार विश्वनाथ वेलादी यांनी मानले. यशस्वीतेसाठी किशोर सुनतकर, अशोक दहागावकर, श्रावण दुर्गे, अजय सोनलवार, गणेश मेकलवार, जगदीश बोम्मावार, अमोल दुर्योधन, तेजराव दुर्गे यांनी सहकार्य केले.