शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडू रडले : ६० वर्षात पहिल्यांदाच नामुष्की, चारवेळेचा चॅम्पियन इटली विश्वचषकाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 04:47 IST

प्ले आॅफच्या दुस-या फेरीतील स्वीडनविरुद्ध अनिर्णीत राहिलेला सामना इटलीला चांगलाच महागात पडला आहे. या सामन्यानंतर इटलीच्या विश्वचषकातील आशा संपुष्टात आल्या.

मिलान : प्ले आॅफच्या दुस-या फेरीतील स्वीडनविरुद्ध अनिर्णीत राहिलेला सामना इटलीला चांगलाच महागात पडला आहे. या सामन्यानंतर इटलीच्या विश्वचषकातील आशा संपुष्टात आल्या. सामना बरोबरीत राखणा-या स्वीडनने २०१८ च्या फिफा विश्वचषकात स्थान निश्चित केले.चारवेळा विश्वचॅम्पियन्स राहिलेल्या इटलीला हा मोठा धक्का आहे. गेल्या ६० वर्षात विश्वचषकासाठी अपात्र ठरण्याची नामुष्की संघावर ओढवली आहे. तर, दुसरीकडे स्वीडनचा संघ २००६ नंतर दुुस-यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरला.विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी पात्रता फेरीत इटलीसमोर स्वीडनचे आव्हान होते. यापूर्वी स्वीडनने इटलीला १-१ असे पराभूत केले होते. पहिल्या फेरीत स्टॉकहोमच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात जॅकब योहानसनच्या गोलच्या जोरावर स्वीडनने इटलीला पराभूत केले होते.परिणामी दुसºया सामन्यात स्वीडनला पराभूत करणे इटलीसाठी अनिवार्य झाले होते. पण, सामन्यात उभय संघांकडून गोल झाला नाही. यापूर्वी १९५८ मध्ये इटलीला विश्वचषकात स्थान मिळवण्यात अपयश आले होते.इटलीच्या खेळाडूंचे चेंडूवर बराचवेळ वर्चस्व होते. पण गोल नोंदविण्यात त्यांना अपयश आले. २००६ चा विजेता इटली संघ ७४ हजार पाठिराख्यांच्या प्रोत्साहनानंतरही गोल नोंदविण्यासाठी अक्षरश: संघर्ष करताना दिसला. गोलकीपर बुफोनची निवृत्ती-६० वर्षांत पहिल्यांदा विश्वचषकापासून वंचित राहिलेल्या इटलीचा गोलकीपर जिर्यालुईगी बुफोन याने आंतरराष्ट्रीय फूटबॉलमधून निवृत्ती पत्करली. इटलीसाठी त्याने १७५ वा आणि स्वीडनविरुद्ध अखेरचा सामना खेळला.‘ अशाप्रकारे अलविदा होत असल्याचा मला खेद आहे. मी इटलीच्या चाहत्यांची माफी मागतो, असे त्याने रडत रडत सांगितले. त्याच्यासोबतच इटली संघातील मिडफिल्डर डॅनियल रोस्सी आणि आंद्रिया बार्जागली यांनीदेखील खेळाला रामराम ठोकला.इटलीचा संघ तीनदा विश्वचषकापासृून वंचित राहिला. १९३० मध्ये या संघाला प्रवेश मिळू शकला नव्हता.त्यानंतर १९५८ मध्ये हा संघ दुसºयांदा विश्वचषकाची पात्रता सिद्ध करू शकला नव्हता. यंदा पुन्हा एकदा या संघाला अपयश आले.

टॅग्स :FootballफुटबॉलItalyइटली