शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्पॅनिश धडाक्यापुढे नायजेरचा धुव्वा , ४-० विजयासह स्पेनच्या बाद फेरीच्या आशा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:23 IST

पहिल्या सामन्यात बलाढ्य ब्राझीलकडून झालेल्या पराभवानंतर स्पेनने १७ वर्षांखालील फिफ विश्वचषक स्पर्धेत नवख्या नायजेरचा ४-० असा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह स्पेनने बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या.

कोची : पहिल्या सामन्यात बलाढ्य ब्राझीलकडून झालेल्या पराभवानंतर स्पेनने १७ वर्षांखालील फिफ विश्वचषक स्पर्धेत नवख्या नायजेरचा ४-० असा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह स्पेनने बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या.येथील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अबेल रुइझ याने पहिल्याच सत्रात दोन गोल करून स्पेनचा शानदार विजय निश्चित केला. सलामीला ब्राझीलविरुद्ध १-२ असा पराभव झाल्यानंतर बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी स्पेनला मोठा विजय आवश्यक होता आणि दुबळ्या नायजेरच्या रुपाने मिळालेल्या संधीचा फायदा घेत स्पेनने धडाका केला. ‘ड’ गटात स्पेन, ब्राझील व नायजेर यांचे प्रत्येकी ३ गुण झाले आहेत, परंतु उत्कृष्ट गोलसरासरीच्या जोरावर स्पेनने अव्वल स्थान मिळवले आहे.अबेलने २१ व्या आणि ४१ व्या मिनिटाला गोल करत स्पेनला भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर, ४६ व्या मिनिटाला सिझर गेलबर्टयाने गोल करून स्पेनला मध्यंतराला ३-० असे मजबूत नियंत्रण मिळवून दिले.दुसºया सत्रात स्पेनने आणखी आक्रमक चाली रचल्या, परंतु नायजेरने गोल करण्यापासून त्यांना रोखण्यात यश मिळवले. ८२ व्या मिनिटाला सर्जिओ गोमेझ याने अप्रतिम गोल करत स्पेनच्या ४-० अशा एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल