शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सने उडवला न्यू कॅलेडोनियाचा फडशा, इंग्लंडचाही धमाकेदार विजय; चिलीला ४-० ने लोळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:53 IST

बलाढ्य फ्रान्सने १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ‘इ’ गटामध्ये धमाकेदार विजयी सलामी देताना न्यू कॅलेडोनियाचा ७-१ असा फडशा पाडला.

गुवाहाटी : बलाढ्य फ्रान्सने १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ‘इ’ गटामध्ये धमाकेदार विजयी सलामी देताना न्यू कॅलेडोनियाचा ७-१ असा फडशा पाडला. दुसरीकडे ‘फ’ गटात बलाढ्य इंग्लंडनेही दणदणीत विजय मिळवताना चिलीचा ४-० असा धुव्वा उडवला.इंदिरा गांधी स्टेडियमवर फ्रान्सने जबरदस्त धमाका करताना स्पर्धेत पदार्पण करणाºया न्यू कॅलेडोनियाला फुटबॉलचे धडेच दिले. फ्रान्सच्या धडाक्यापुढे गोंधळलेल्या कॅलेडोनियाकडून दोन स्वयंगोल झाले. बेर्नार्ड इवा आणि कियाम वेनेस्सी यांनी अनुक्रमे ५ व्या आणि ४३ व्या मिनिटाला आपल्या गोलजाळ्यात चेंडू धाडून फ्रान्सच्या विजयामध्ये हातभार लावला. तसेच, अमिन गौइरी याने १९ व्या आणि ३३ व्या मिनिटाला गोल करून फ्रान्सच्या विजयात मोलाचे योगदान दिले. क्लॉडिओ गोम्स, मॅक्सेन्स काक्वेरेट आणि विल्सन इसिडोर यांनीही प्रत्येकी एक गोल करताना फ्रान्सच्या शानदार विजयामध्ये हातभार लावला. दरम्यान, अखेरच्या मिनिटाला कॅलेडोनियाने आक्रमक खेळ केला खरा, पण तोपर्यंत बराच उशीर झालेला. अखेरच्या मिनिटाला सिद्री वेडेंगेस याने एक गोल नोंदवून संघाचा एकमेव गोल केला.दुसरीकडे, कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर स्टार खेळाडू जेडेन सांचो याने केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर इंग्लंडने चिलीची ‘गरमी’ ४-० अशी उतरवली. सांचोने ५१ व्या आणि ६० व्या मिनिटाला गोल करून चिलीचे मानसिक खच्चीकरण केले. त्याआधी हडसन ओडोइ याने ५ व्या मिनिटाला वेगवान गोल करत इंग्लंडला १-० असे आघाडीवर नेले होते आणि सांचोने ही आघाडी ३-० अशी भक्कम केली.८१ व्या मिनिटाला अँजेल गोम्स याने गोल करून चिलीच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आणल्या. विशेष म्हणजे इंग्लंडने चिलीच्या गोलजाळ्यावर तब्बल २१ हल्लेकेले, त्यापैकी त्यांचे ४ हल्ले यशस्वी ठरले. दरम्यान, ७९ व्या मिनिटाला गोलरक्षक ज्युलिओ बोरकेजयाला लाल कार्डाला सामोरे जावे लागल्याने चिलीने उर्वरित सामना १० खेळाडूंसह खेळला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल