शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

मेस्सीवर अपेक्षांचे भलेमोठे ओझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 04:08 IST

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा दुसरा आठवडा सुरू झाला असून, अनेक अनपेक्षित निकाल समोर आले आहे.

-ंअयाझ मेमनविश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा दुसरा आठवडा सुरू झाला असून, अनेक अनपेक्षित निकाल समोर आले आहे. यामध्ये सर्वात मोठा धक्कादायक निकाल लागला, तो अर्जेंटिनाचा पराभव. ते स्पर्धेबाहेर गेले नाही, पण त्या मार्गावर नक्कीच आहेत. अखेरचा सामना जिंकणे त्यांच्यासाठी अनिवार्य बनले आहे. संभाव्य विजेत्यांपैकी एक असलेल्या अर्जेंटिनाचा खेळ पाहून सर्वांनाच धक्का बसला. याचेकारण काय, तर दिग्गज मेस्सी अपयशी ठरतोय. एक संघ म्हणून ते विस्कळीत झालेले दिसत आहेत. अर्जेंटिनाची प्रसिद्ध ३-५-२ प्रणाली या वेळी पूर्ण अपयशी ठरली. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसरा सामना ते हरले. हा संघ सर्वाधिक मेस्सीवर अवलंबून राहिल्याचेदिसले, सहाजिकच आहे ते... कारण जगातील अव्वल खेळाडू म्हणून मेस्सीची ओळख आहे. रोनाल्डोच्या तुलनेत मेस्सी सध्या अडचणीतआहे. प्रतिस्पर्धी संघांना कल्पना आहे की, मेस्सीला थोडी जरी जागा दिली, तर तो खूप धोकादायक ठरेल. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात कोंडी करण्यात येत आहे. त्याचबरोबर, मेस्सीवर अपेक्षांचे खूप मोठे ओझे आहे. खास करून संपूर्ण अर्जेंटिनाला त्याच्याकडून विश्वविजेतेपदाची अपेक्षा आहे. हे ओझेच खेळाडूला अनेकदा भारी पडते. क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे भारताच्या सर्व आशा सचिन तेंडुलकरवर टिकून असायच्या, त्याचप्रमाणे मेस्सीवरही त्याच्या देशवासीयांच्या आशा आहेत, पण सचिन ज्या विश्वचषक स्पर्धांत खेळला, त्यामध्ये जवळपास सर्वच स्पर्धांत तो सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये राहिला आहे. त्याउलट मेस्सी मात्र, विश्वचषक स्पर्धेत अपयशी ठरला आहे. त्यामुळे यंदा त्याची जादू चालली नाही, तर त्याने अर्जेंटिनासाठी काहीच केले नाही, अशीच त्याची कारकिर्द राहील.दुसरीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष भारताच्या इंग्लंड दौºयाकडे लागले आहे. इंग्लंडने नुकताच एक सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम नोंदविला असल्याने, भारतापुढे नक्कीच एक तगडे आव्हान असेल, तसेच वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या श्रीलंका-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत मोठे वादळ उठले. लंका कर्णधार दिनेश चंदीमल त्याला चेंडू छेडछाड प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. सुरुवातीला चंदीमलने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले, पण जेव्हा पुरावे समोर आले, तेव्हा मात्र त्याने आरोप कबूल केला. त्यामुळे आयसीसीने आता त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली. दखल घेण्याची बाब म्हणजे, स्मिथ-वॉर्नर प्रकरणाला तीन महिनेही झाले नाही आणि त्यांना एका वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागत असतानाही, येथे एक कर्णधार या प्रकरणातून काहीच शिकला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे चेंडू छेडछाड प्रकरण किती गंभीर प्रश्न आहे, हे यावरून दिसून येत आहे.(संपादकीय सल्लागार)

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८