बार्सिलोना : दिग्गज फुटबॉलपटू आणि बार्सिलोनाचा कर्णधार लियोनल मेस्सीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे तो तीन आठवडे मैदानापासून दूर राहणार आहे. या दुखापतीमुळे स्पेनिश लीगमध्ये पुढील आठवड्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी रियाल माद्रिदविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे तो चॅम्पियन्स लीगमध्ये बुधवारी इंटर मिलानविरुद्ध आणि ६ नोव्हेंबरला इटलीत होणा-या सामन्यातदेखील खेळू शकणार नाही. त्याला ही दुखापत शनिवारी कॅम्प नाऊ स्टेडियममध्ये सेविलाविरुद्ध झालेल्या स्पेनिश लीग सामन्यात झाली. दुखापतीआधी मेस्सीने गोलही केला होता. त्यामुळे बार्सिलोनाने ४-२ विजय मिळवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली.
दुखापतीमुळे मेस्सी तीन आठवडे मैदानापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 04:53 IST