माद्रीद : ख्रिस्तियानो रोनाल्डोने निलंबनानंतर पुनरागमन करीत केलेल्या दोन महत्त्वपूर्ण गोलमुळे गतविजेता रियाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉल सामन्यात एपीओईल निकोसियाला ३-० असे पराभूत केले.स्पॅनिश सुपर चषक स्पर्धेत पंचांना धक्का मारल्याबद्दल रोनाल्डोवर पाच सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर संघात परतलेल्या रोनाल्डोने आपल्या दर्जाला साजेसा खेळ केला. सामन्याच्या १२ व्या मिनिटालाच पहिला गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर ५१ व्या मिनिटाला दुसरा गोल करीत त्याने ही आघाडी वाढविली. त्यांनतर ६१ व्या मिनिटाला त्याचा सहकारी सर्जियो रोमासने गोल करीत संघाची आघाडी ३-० अशी केली.दरम्यान, रोट्टेरडॅममध्ये झालेल्या एका सामन्यात मॅँचेस्टर सिटीने फेऐंओर्डला ४-० असे पराभूत केले. मॅँचेस्टरच्या जॉन स्टोनने दोन गोल केले. लिव्हरपूर येथे झालेल्या सामन्यात लिव्हरपूल व सिविला दरम्यानचा सामना २-२ असा बरोबरीत सुटला. लंडनमध्ये ‘एच’ गटातील टोटेनहॅमने ब्रोसिया डोर्टनहॅमला ३-१ अशा गोल फरकाने पराभूत केले.
रोनाल्डोच्या पुनरागमनाने माद्रिद विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:38 IST