शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रवरा कन्या’ कडे राज्याचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 19:05 IST

पुणे बालेवाडी क्रीडानगरीत झालेल्या १७ वर्षाखालील मुलींच्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेत लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या संघाने पुणे विभागाचे नेतृत्व करताना विजेतेपद पटकाविले. हा संघ आता दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.

ठळक मुद्देफुटबॉल स्पर्धा सुब्रतो मुखर्जी चषक
लोणी : पुणे बालेवाडी क्रीडानगरीत झालेल्या १७ वर्षाखालील मुलींच्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेत लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या संघाने पुणे विभागाचे नेतृत्व करताना विजेतेपद पटकाविले. हा संघ आता दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागातील संघ सहभागी झाले होते. पुणे विभागाचे नेतृत्व करीत असलेल्या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या खेळाडूंचा पहिला सामना लातूर विभागाशी झाला. लातूर विभागाचा ९-० असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत या संघाने अटीतटीच्या सामन्यात अमरावती विभागाच्या संघाला ३-२ ने पराभव करीत अंतिम फेरीत अप्रतिम खेळ करून बलाढ्य मुंबईच्या संघाचा ४-१ असा पराभव केला. या सामन्यात पूजा काळे, ज्ञानेश्वरी मडके, श्रृती मेखे यांनी गोल नोंदविले. भाग्यश्री लोकरे(गोलकिपर) सई काळे,राणी कदम, दिव्या खताळ, प्रांजली नांगरे, क्षितिजा वराळ, संजना ढाले, अदिती नाईक यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या संघात स्नेहल कळमकर, किर्ती गोसावी, साक्षी बने, प्रतीक्षा वरखेडे यांचा समावेश असून हा संघ १ ते ५ सप्टेंबरदरम्यान नवी दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. या खेळाडूंना प्राचार्या लिलावती सरोदे, क्रीडा शिक्षिका विद्या गाढे, कल्पना कडू, घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंना डॉ. सुजय विखे यांनी शुभेच्छा देऊन प्रोत्साहन दिले.