शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संतोष ट्रॉफीत केरळ चॅम्पियन, पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:44 IST

गोलरक्षक मिधुन व्ही. याच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर केरळने आज येथे संतोष ट्रॉफीच्या ७२ व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत गत चॅम्पियन बंगालला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असे पराभूत करीत विजेतेपद पटकावले.

कोलकाता  - गोलरक्षक मिधुन व्ही. याच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर केरळने आज येथे संतोष ट्रॉफीच्या ७२ व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत गत चॅम्पियन बंगालला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असे पराभूत करीत विजेतेपद पटकावले.निर्धारित व अतिरिक्त वेळेत दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते आणि त्यानंतर निकालासाठी शूटआऊटची मदत घ्यावी लागली. संतोष ट्रॉफीत केरळने १३ वर्षांनंतर हे विजेतेपद पटकावले. त्यांचे हे एकूण या स्पर्धेतील सहावे विजेतेपद आहे. या रोमहर्षक लढतीत निर्धारित ९0 मिनिटांनंतर सामना १-१ असा बरोबरीत राहिला. ३0 मिनिटांच्या अतिरिक्त खेळानंतर सामना २-२ गोलने बरोबरीत सुटला. विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर (सॉल्टलेक स्टेडियम) खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या १९ व्या मिनिटाला जितीन एम. एस.ने गोल करीत केरळला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात केरळने आघाडी कायम ठेवली.६८ व्या मिनिटाला जितेन मुर्मू याने गोल करीत बंगालला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर निर्धारित वेळेत दोन्ही प्रतिस्पर्धी संघ गोल करू शकले नाहीत. त्यामुळे हा सामना अतिरिक्त वेळेत खेचला गेला. यावेळी, केरळच्या विबिन थॉमस आणि बंगालच्या तीर्थंकर सरकारने प्रत्येकी एक गोल करीत ही लढत २-२ पेनल्टी शूटआऊटमध्ये नेली.मिधुन ठरला शिल्पकारशूटआऊटमध्ये मिधुन हा केरळच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने बंगालच्या अंकित मुखर्जी आणि नबी हुसैन यांचे पहिले दोन पेनल्टी शॉट यशस्वीपणे रोखले. त्यानंतर सरकार व संचयन समाद्दरने गोल केले जे की, बंगालसाठी पुरेसे नव्हते. केरळच्या खेळाडूंनी सुरुवातीच्या चारही पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले. हे गोल व्ही. राज, जितीन गोपालन, जस्टिन जॉर्ज व सीसान एस. यांनी केले.

टॅग्स :KeralaकेरळFootballफुटबॉल