शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

जॅक्सन सुरुवातीला डावलला गेला होता...अन् केला ऐतिहासिक गोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:21 IST

फिफा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा पहिला भारतीय खेळाडू असा इतिहास रचलेला जॅक्सन सिंगला सुरुवातीला निवडकर्त्यांनी डावलले होते.

मुंबई : फिफा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा पहिला भारतीय खेळाडू असा इतिहास रचलेला जॅक्सन सिंगला सुरुवातीला निवडकर्त्यांनी डावलले होते. मात्र, आपली निवड सार्थ ठरवताना जॅक्सनने स्वत:ला सिद्ध केले. कोलंबियाविरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात जॅक्सनने भारताला पिछाडीवरून बरोबरी साधून दिली होती. परंतु, तो सामना जिंकण्यात भारताला अपयश आले होते.१७ वर्षांखालील भारतीय संघात जॅक्सनच्या निवड होण्याची गोष्ट खूप रंजक आहे. भारताच्या युवा संघाच्या निवडीसाठी निवडकर्ते चंदीगड फुटबॉल अकादमीमध्ये गेले होते. त्याठिकाणी जॅक्सनही चाचणी फेरीसाठी उपस्थित होता. परंतु, ६ फूट उंचीचा जॅक्सन त्यांना खटकला. १४ वर्षांच्या तुलनेत इतकी उंची खूप जास्त असल्याचे मत निवडकर्त्यांनी दिले आणि जॅक्सनला थेट नकार दिला होता. परंतु, जॅक्सनने हार मानली नाही. एक दिवस आपण भारताकडून नक्की खेळू, असा ठाम विश्वास असल्याने त्याने प्रयत्न सोडले नव्हते.यानंतर, जॅक्सनने पंजाबच्या मिनर्वा अकादमीकडून खेळताना वयाच्या १६ व्या वर्षी सर्वांचे लक्ष वेधले. मात्र, तरीही युवा विश्वचषक स्पर्धेचे द्वार त्याच्यासाठी कठीण बाब होती. दरम्यान, युवा भारतीय संघाविरुद्ध गोव्यात झालेल्या मैत्री सामन्यात जॅक्सनने मिनर्वा संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या वेळी उपस्थित असलेले प्रमुख प्रशिक्षक लुईस नॉर्टन दि मातोस यांनी लगेच मिनर्वा संघातील नोंग्डाबा नाओरेम, मोहम्मद शाहजहान, अन्वर अली यांच्यासह जॅक्सनलाही लगेच १७ वर्षांखालील भारतीय संघात निवडले. जॅक्सनचे वडील देबेन स्वत: फुटबॉलपटू होते. त्यांनी जॅक्सनला फुटबॉलचे प्राथमिक धडे दिले.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल