शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा ५-० ने दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 04:12 IST

भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने एकतर्फी झालेल्या फुटबॉल सामन्यात चीनी तैपेईवर ५ -० असा दणदणीत विजय मिळवला.

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने एकतर्फी झालेल्या फुटबॉल सामन्यात चीनी तैपेईवर ५ -० असा दणदणीत विजय मिळवला.मुंबईतील फुटबॉल अरेनात झालेल्या आंतरखंडीय स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सबकुछ सुनील छेत्री असे स्वरूप होते. चीनी तैपेई संघाला भारताचा स्ट्रायकर आणि कर्णधाराच्या आक्रमक आणि वेगवान खेळाला रोखणे शक्यच झाले नाही.आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ९९ वा सामना खेळत असलेल्या सुनिल छेत्री याने १४ व्या, ३४ व्या आणि ६२ व्या मिनिटाला गोल केला. यजमान संघाकडून उदांता सिह आणि प्रणय हलधर यांनी अनुक्रमे ४८ व्या आणि ७८ व्या मिनिटाला गोल केले.मध्यांतरापर्यंत भारतीय संघ दोन गोलने आघाडीवर होता. त्यानंतर उदांता सिंह याने गोल करत भारताची आघाडी मजबूत केली. भारतीय संघाचा पुढचा सामना चार जूनला केनियासोबत होईल तर पाच जूनला न्युझीलंड आणि चीनी तैपेई यांच्यात सामना होईल. किर्गिस्तान विरोधातील पराभवानंतर प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेनटाईन यांच्यासाठी हे एक मोठे पुनरागमन मानले जात आहे. सामन्यात तिसऱ्या मिनिटाला उदांता सिंह याने सुनील छेत्रीकडे पास देत गोल करण्याची संधी निर्माण केली होती. मात्र हा गोल होऊ शकला नाही. त्यानंतर दोन्ही संघाकडून एकमेकांच्या गोलपोस्टवर आक्रमण झाले. १४ व्या मिनिटाला जेजे याने चीनी तैपेईच्या संरक्षकांना चकवून छेत्रीकडे पास दिला. त्यानंतर छेत्री याने आपले कौशल्य दाखवत अप्रतिम गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्यावर भारताचे वर्चस्व राहिले.