शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

भारतीय संघाने प्रेरणा घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:19 IST

फुटबॉलच्या आठवणी जेवढ्या संस्मरणीय असतात तेवढ्याच अनेकदा कठोरही असतात. फिफा मानांकनामध्ये दहाव्या स्थानावर असलेल्या कोलंबियाविरुद्ध भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही, त्या वेळी हे अनुभवाला मिळाले.

गुरप्रीतसिंग संधू लिहितात...फुटबॉलच्या आठवणी जेवढ्या संस्मरणीय असतात तेवढ्याच अनेकदा कठोरही असतात. फिफा मानांकनामध्ये दहाव्या स्थानावर असलेल्या कोलंबियाविरुद्ध भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही, त्या वेळी हे अनुभवाला मिळाले. ही लढत संघातील खेळाडूंसाठी नेहमी संस्मरणीय राहील. आम्हीसुद्धा ही लढत कधीच विसरू शकणार नाही. गोल नोंदविल्यानंतर पुढचा मिनिट किती महत्त्वाचा आहे, याची कल्पना खेळाडूंना आली असेल. अशा वेळी स्वत:ला शांत ठेवणे आणि प्रतिस्पर्धी संघाकडून गोल न खाणे महत्त्वाचे असते. पण, हा सर्व खेळाचा एक भाग आहे. जर तुम्ही चूक केली नाही तर तुम्ही चांगले खेळाडू होऊ शकत नाही. लक्ष्यापासून विचलित झाले तर नुकसान होऊ शकते. पण, तुम्ही जर १६ वर्षांचे असला तर या पातळीवर अशा प्रकारच्या वातावरणात खेळताना विचलित होणे स्वाभाविक आहे. पण, भारतीय संघ घानाविरुद्ध पुढच्या लढतीत यावर लक्ष ठेवेल. कोलंबियाप्रमाणे घानाचा संघही मजबूत आहे.संघातील प्रत्येक खेळाडूने क्षमतेनुसार मैदानावर सर्वस्व झोकून खेळ करायला हवा. आम्ही कोलंबियाला पराभूत करू शकत होतो आणि प्रत्येक खेळाडूने या बाबीपासून प्रेरणा घ्यायला हवी. आपण स्वत:साठी निकष तयार केले आहेत. माझ्या मते प्रत्येक खेळाडूने वैयक्तिक हे निकष पूर्ण करायला हवे.जॅक्सन सिंगचा गोल बघणे सुखद व शानदार अनुभव होता. बेंगळुरुमध्ये आपल्या हॉटेल रुमध्ये टीव्हीवर गोल नोंदविल्याचे बघितल्यानंतर मी व संदेश झगिन आपल्या बेडवरून जवळजवळ उसळलो. फिफा विश्वकपमध्ये भारतातर्फे हा पहिला गोल होता. आम्ही प्रदीर्घ कालावधीपासून प्रतीक्षा करीत असलेला हा क्षण होता. काऊंटर अटॅकवर गोल खाल्ल्यानंतरही त्या गोलचा जल्लोष सुरूच होता.या गोलमुळे आम्ही केवळ हजेरी लावणार नाही, याची फुटबॉल जगताला कल्पना आली असेल. संघाचा बचाव मजबूत आहे आणि आघाडीची फळीही एकमेकांना साथ देत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे घानाविरुद्धच्या लढतीतही खेळाडूंकडून सांघिक कामगिरी अपेक्षित आहे. स्टेडियममध्ये पुन्हा एकदा जल्लोष अनुभवायला मिळेल, याची मला आशा आहे. (टीसीएम)

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल