शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारत - रशिया मैत्री चिरायू होवो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 04:13 IST

हवामानाचा अंदाज नेहमीच पक्का नसतो. मंगळवारी झारचा ग्रीष्मकालीन प्रासाद पाहावयास गेलो असताना चक्क कडकडीत ऊन पडले होते.

- रणजीत दळवीहवामानाचा अंदाज नेहमीच पक्का नसतो. मंगळवारी झारचा ग्रीष्मकालीन प्रासाद पाहावयास गेलो असताना चक्क कडकडीत ऊन पडले होते. म्हटले पावसाचे शुक्लकाष्ट दूर झाले; पण दुसऱ्या दिवशी त्याच झारच्या शीतकालीन प्रासादाच्या भेटीदरम्यान चक्क पाऊस! सोबत घोंघावणारे वारे! कोठे कालचा तो घाम फोडणारा उष्मा आणि कोठे आमच्यासारख्या भारतीयांना भरलेली ती हुडहुडी? केवढा फरक पडला होता तापमानामध्ये.झारच्या पीटर्सबर्ग शहरातील प्रासाद केवढा विस्तीर्ण! पंधराशे खोल्या, अबब...! त्याला ‘हर्मिटेज’ म्हणून ओळखले जाते. नेवा नदीच्या तीरावरील हा प्रासाद सेंट पीटर्सबर्गचेच नव्हे, तर कदाचित रशियाचेही प्रमुख आकर्षण असावे. याच प्रासादामध्ये झारची राजवट उलथवून टाकल्यानंतर हंगामी सरकार कार्यरत होते; पण २५/२६ आॅक्टोबर १९१७ रोजी बोल्शेविक फौजांनी त्यावर हल्ला करून नवे सरकार स्थापले व लेनिनने त्याची सूत्र आपल्या हाती घेतली.झार जोपर्यंत सत्तेवर होता, तोपर्यंत सुमारे साडेसहा लाख चौ.मी. जागा ही निव्वळ त्याच्या वापरासाठी वापरली जात होती. आज त्याच ठिकाणी वस्तुसंग्रहालय आहे, ज्याची व्याप्ती आहे सुमारे वीस लाख चौ.मीटर. जसजसे एकेक दालन ओलांडून जावे, तसतसे झारची संपत्ती किती, त्याचे राहणीमान कसे, हे सारे पाहावे तसे समजत जाते. सोव्हिएत रशियाच्या क्रांतीचे मूळच यात दडले आहे, हे सांगावयाची गरज नाही. कष्टकºयांना मग ते मजूर असो की शेतकरी, त्यांना त्याची चीड आली. ते क्रुद्ध झाले व एका वैभवशाली राजवटीचा तेवढ्याच क्रूर पद्धतीने कसा अंत झाले हे आपण पाहिलेच.ज्या जुलूमशाही राजवटीचा प्रथम मत्सर व नंतर अंत केला, त्याच आज विद्यमान राजवटीला आपल्या देशाची महानता प्रदर्शित करण्यासाठी अनंत हस्ते भेट देत आहेत. आज तर विश्वाच्या पूर्वेकडील, तसेच अतिपूर्वेकडील जपान, कोरिया, व्हिएतनाम आणि चीनचे पर्यटक अक्षरश: टोळआडीसारखे उतरले होते. तिकीट ७०० रुबल म्हणजे ८०० रुपयांच्या जवळपास. म्हणजे सरकारी खजिन्यात झारमुळे भर पडते. या वस्तुसंग्रहालयाची देखभाल करावी लागते हे खरे; पण त्यापासून उत्पन्न होत नाही हे पटण्यासारखे नाही.विविध देशांची दालने येथे आहेत, ज्याद्वारे त्या देशांमधील संस्कृती, कला, इतिहास यांचे दर्शन होते. आपल्या देशाच्या दालनात नेमके काय आहे हे पाहण्याचे मोठे कुतूहल होते. घाईत पाहणे व समजणे कठीण होते; पण श्रीगणेश, भगवान बुद्ध यांच्या मूर्तींनी लक्ष वेधून घेतले. अगदी वेगळीच शिल्पे होती, तशी पाहण्यात न आलेली. विशेषत: बाप्पाचे कान आणि मुकूट! त्यांचे पोटही कोरताना शिल्पकाराने ते आटोपशीर ठेवल्याचे जाणवले. भगवान बुद्धाच्या चेहºयावरील आणि डोळ्यांतील भाव म्हणजे करुणासागरच जणू. या सर्व मूर्ती भारताकडून भेटरूपाने मिळालेल्या. आमची शिल्पकला व आमच्या संस्कृतीची दोन प्रतीके तेथे पाहून आनंद झाला. त्याहीपेक्षा आणखीन आनंद झाला अशीच प्रभू रामचंद्राची अपारंपरिक शैलीतील मूर्ती पाहताना. भारत-रशिया मैत्री चिरायू होवो! असे म्हणत साडेतीन तासांची अपूर्ण परिक्रमा आटोपती घेतली.फुटबॉलविषयी म्हणायचे तर, यजमान रशियाच्या कामगिरीने सर्वच चकीत झाले आहेत. ज्या संघाकडून त्यांच्याच देशवासियांना कोणतीही आशा नव्हती, अशा रशियाने सलग दोन सामन्यात मोठे विजय मिळवत लक्षवेधी कामगिरी केली. पहिल्या दोन सामन्यांतच ८ गोल झळकावल्यानंतर रशियन आत्तापासूनच विश्वचषकाचे स्वप्न रंगवू लागले आहेत. जेव्हा राष्ट्रपती पुतिन यांनी यजमानपद मिळवल्यानंतर रशियाच्या विश्वविजेतेपदाची आशा व्यक्त केली होती, तेव्हा रशियन लोकांनी याकडे अतिशयोक्ती म्हटले होते. परंतु, आता संघाच्या शानदार कामगिरीनंतर रशियन्स जगज्जेतेपदाच्या आशा करु लागले आहेत. रशियाच्या सलग दुसºया विजयानंतर मोठा जल्लोष झाला. सध्या सेंट पीटर्सबर्गमध्ये कडक उन आहे. जणू काही सूर्याचा सोनेरी प्रकाश रशियन फुटबॉलला उजळवत आहे. येथील भूमी शतकभरापुर्वी झालेल्या क्रांतीने पावन झाली. त्यानंतर येथील लोकांचा विकास झाला. रशियाच्या दुसºया विजयानंतर त्यांचा अंतिम १६ स्थानामध्ये प्रवेश निश्चित झाला. खरोखरीच ही त्यांच्या फुटबॉल क्रांतीची नांदी तर नाही ना? पाहूया, येणारा काळच त्यांच्या फुटबॉलचे भवितव्य ठरवेल.