शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

होंडुरासने पाडला न्यू कॅलेडोनियाचा फडशा, इराकने चिलीचा ३-० असा धुव्वा उडवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:30 IST

अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात होंडुरासने ‘ई’ गटात दणदणीत विजयाची नोंद करताना न्यू कॅलेडोनियाचा ५-० असा फडशा पाडला.

गुवाहाटी : अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात होंडुरासने ‘ई’ गटात दणदणीत विजयाची नोंद करताना न्यू कॅलेडोनियाचा ५-० असा फडशा पाडला. यासह होंडुरासने बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. तसेच, अन्य सामन्यात ‘फ’ गटात इराकने चिलीचे कडवे आव्हाना ३-० असे परतावून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले.गुवाहाटीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात होंडुरासकडून कार्लोस मेजियाने २५व्या आणि ४२व्या मिनिटाला शानदार गोल केले. तसेच, पॅट्रिक पालसियोस याने ५१व्या आणि ८८व्या मिनिटाला गोल करुन न्यू कॅलेडोनियाच्या बचावाला खिंडार पाडले. या दोघांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर होंडुरासने दणदणीत विजय निश्चित केला. दरम्यान, जोशुआ कनालेस यानेही २७व्या मिनिटाला एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. न्यू कॅलेडोनियाला यासह स्पर्धेत सलग दुसºयांदा मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले.दुसरीकडे कोलकाताच्या विवेकानंद युवा भारती स्टेडियमवर इराकने चिलीचा ३-० असा धुव्वा उडवला. दाऊदने सहाव्याच मिनिटाला केलेल्या वेगवान गोलमुळे इराकचा आत्मविश्वास दुणावला. यानंतर, पुन्हा एकदा दाऊदने ६८व्या मिनीटाला फ्री किकवर गोल करुन संघाला २-० असे आघाडीवर नेले. इराकच्या धडाक्यापुढे दडपणाखाली आलेल्या चिलीकडून अनेक चुकाही झाल्या. त्यात, ८१व्या मिनिटाला चिलीच्या दिएगो वेलेंसियाकडून स्वयंगोल झाल्याने इराकच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब झाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल