शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

हीरो ठरले झीरो

By प्रसाद लाड | Updated: July 15, 2018 04:49 IST

महिनाभर सारे जग फुटबॉलमय झाले. सगळीकडे विषय फुटबॉलचाच. पण विश्वचषक सुरू होण्यापूर्वी मात्र सर्वांच्या मुखी फक्त तीन खेळाडूंचीच नावे होती.

महिनाभर सारे जग फुटबॉलमय झाले. सगळीकडे विषय फुटबॉलचाच. पण विश्वचषक सुरू होण्यापूर्वी मात्र सर्वांच्या मुखी फक्त तीन खेळाडूंचीच नावे होती. ती म्हणजे रोनाल्डो, मेस्सी आणि नेमार. ही त्रिमूर्ती विश्वचषकात काय रंग दाखवते, याची साऱ्यांना उत्सुकता होती. पण या तिघांनाही विश्वचषकात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही; आणि त्यामुळेच फुटबॉलच्या क्षितिजावरचे हे हीरो ठरले झीरो, असे म्हणण्याची वेळ आली आहे.रोनाल्डोने विश्वचषकाची सुरुवात झोकात केली होती. स्पेनविरुद्धच्या लढतीत रोनाल्डोने महत्त्वाची भूमिका बजावली. हॅट्ट्रिकसह त्याने संघाला पराभवापासून वाचवले. पण यानंतर रोनाल्डोला फक्त एकच गोल करता आला. त्याचबरोबर धसमुसळा खेळ केल्याने त्याला दोन वेळा पिवळे कार्डही देण्यात आले.मेस्सीची जादू चालणार का... असे बºयाचदा विश्वचषकापूर्वी आपण ऐकले होते. पण मेस्सीला जादू तर दूरच साधी कामगिरीही चोख निभावता आली नाही. या विश्वचषकात त्याला फक्त एकच गोल करता आला. गेल्या विश्वचषकात त्याने चार गोल केले होते, संघाला तो अंतिम फेरीत घेऊन गेला होता. पण या वर्षी मेस्सीची जादू काही दिसली नाही.नेमारला या विश्वचषकात दोनच गोल करता आले. २०१४ साली झालेल्या विश्वचषकात त्याने चार गोल केले होते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पाहिल्या तर नेमारचा खेळ गेल्या विश्वचषकाच्या तुलनेने या वेळी खालावला. या विश्वचषकात नेमार आपल्या गोलसाठी नाही, तर अभिनयासाठी चांगलाच लक्षात राहिला आहे. सोशल मीडियावर तो ट्रोलही झाला.नावाजलेल्या खेळाडूंना प्रतिस्पर्धी संघ सर्वप्रथम रडारवर घेतो. हे त्या खेळाडूंनाही माहिती असते. पण तरीदेखील काहीतरी वेगळी रणनीती या तिन्ही खेळाडूंकडून दिसली नाही. आपल्या जोरावरच संघ जिंकू शकतो, अशी त्यांची भूमिका होती. जेव्हा एखादा खेळाडू संघापेक्षा मोठा ठरतो, तेव्हा सारी गडबड होते. त्या वेळी त्या खेळाडूने तरी देदीप्यमान कामगिरी करावी किंवा अन्य खेळाडूंना पुढे आणायचे असते. या दोन्ही गोष्टी या तिन्ही खेळाडूंच्या बाबतीत दिसल्या नाहीत. या खेळाडूंची चर्चा जास्त क्लबसाठीच रंगते. या तिघांनी जरा देशाचाही विचार केला असता तर कदाचित वेगळे चित्र आपल्यासमोर असले असते.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८