शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीचा गिनीवर ३-१ दणदणीत विजय, आता कोलंबियाविरुद्ध होणार लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 21:17 IST

युरोपियन पॉवर हाऊस जर्मनीने आधीच्या लढतीतील पराभवानंतर जोरदार मुसंडी मारताना आज येथे आफ्रिकन संघ गिनीवर ३-१ अशी मात करताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला.

कोच्ची : युरोपियन पॉवर हाऊस जर्मनीने आधीच्या लढतीतील पराभवानंतर जोरदार मुसंडी मारताना आज येथे आफ्रिकन संघ गिनीवर ३-१ अशी मात करताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला.येथे जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या क गटाच्या सामन्यात जर्मनीकडून जॉन फिटे आर्प याने आठव्या मिनिटाला, निकालेस कुएन याने ६२ व्या मिनिटाला आणि साहवर्दी सेटिन याने ९२ व्या मिनिटाला गोल केला, तर इब्राहिमा सौमाह याने गिनी संघासाठी एकमेव गोल २६ मिनिटाला केला.जर्मनीला याआधीच्या सामन्यात 0-४ ने पराभव पत्करावा लागला होता. आता ते सहा गुणांसह दुसºया स्थानावर असून, त्यांनी अंतिम १६ संघातील स्थान पक्के केले. आता ते १६ आॅक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे अ गटातील दुसºया स्थानावर असणाºया कोलंबियाविरुद्ध खेळतील.इराणने आज गोवा येथे अन्य एका गटातील सामन्यात कोस्टारिकाचा ३-0 असा पराभव केला. ते या गटातील सर्व सामने जिंकताना ९ गुणांसह अव्वल स्थानावर राहिले. गिनी आणि कोस्टा रिका यांचे प्रत्येकी १ गुण झाले असून, त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.गिनी संघाने सुरुवातीला चेंडूंवर ५५ टक्के नियंत्रण ठेवले होते आणि त्यांनी जास्त शॉटही मारले; परंतु ते लक्ष्यापासून खूप दूर होते. जर्मनीने गिनीच्या गोलपोस्टवर १७ वेळेस हल्ला केला; परंतु त्यातील आठ हल्ले लक्ष्याकडे होते.हॅम्बुर्गसाठी बुंदेसलीगात नुकतेच पदार्पण करणारा जर्मनीचा कर्णधार आर्प याने आपल्या संघाला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली. त्याने गिनीचा डिफेंडरच्या चुकीचा फायदा घेत व गोलरक्षकाला चकवताना गोल केला. तथापि, गिनीने २६ व्या मिनिटाला बरोबरी साधली. सौमाह याने डाव्या पायाने मारलेल्या शॉटवर गोल केला. जर्मनीने पहिल्या सत्राअखेर आघाडी घेण्याचा प्रयत्न केला; परंतु गिनीचा गोलकीपरने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले.४२ व्या मिनिटाला इलियास अबोयुचाबाकाचा गोल करण्याचा प्रयत्न गिनीचा गोलरक्षक मोहम्मद कामारा याने हाणून पाडला. पूर्वार्धात इंज्युरी टाइममध्ये गिनीजवळ आघाडी घेण्याची संधी होती; परंतु एगुईबोरा कामाराचा गोल करण्याचा प्रयत्न जर्मनीचा गोलकीपर लुका प्लोगमान याने अयशस्वी ठरवला.उत्तरार्धात दोन्ही संघांना गोल करण्याची संधी मिळाली. तथापि, जर्मनीने ६२ व्या मिनिटाला आघाडी घेतली. त्यानंतर साहवेर्द सेटिन याने अतिरिक्त वेळेत मिळालेल्या पेनल्टची गोलमध्ये रूपांतर करीत विजयाचे अंतर वाढवले.

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा