शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

फिफा विश्वचषकाचा दौरा दिल्लीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 02:12 IST

देशात पहिल्यांदाच होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाच्या सहा शहरांच्या दौऱ्याला १८ आॅगस्टपासून दिल्ली येथून सुरुवात होईल. स्थानिक आयोजन समितीने (एलओसी) सोमवारी ही घोषणा केली.

नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाच्या सहा शहरांच्या दौऱ्याला १८ आॅगस्टपासून दिल्ली येथून सुरुवात होईल. स्थानिक आयोजन समितीने (एलओसी) सोमवारी ही घोषणा केली. या दौऱ्यात ९ हजार किमीचा प्रवास ४० दिवसांत केला जाईल. फुटबॉल चाहत्यांना सहा शहरांत ‘फिफा चषका’ला पाहता येईल; जेथे भारत आपल्या गटातील सामने खेळेल. दिल्लीत हा चषक १७ ते २२ आॅगस्टपर्यंत असेल. गुवाहाटी येथे २४ ते २९ आॅगस्टपर्यंत चषक असेल. त्यानंतर हा चषक कोलकाता येथे ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत ठेवण्यात येईल. गोव्यात हा चषक १४ ते १९ सप्टेंबरदरम्यान असेल. या दौऱ्याचा शेवट कोची येथे होईल. येथे २१ ते २७ सप्टेंबरपर्यंत चषक ठेवण्यात येईल. दरम्यान, भारतात प्रथमच होणारी ही स्पर्धा ६ ते २८ आॅक्टोबर दरम्यान खेळविण्यात येणार आहे.हा आपल्यासाठी दुर्मिळ क्षण आहे. आशा आहे की, मोठ्या संख्येने सहा शहरांतील लोक फिफाचा विश्वचषक पाहतील. या रॅलीमुळे देशात फुटबॉलची लोकप्रियताही वाढेल.- प्रफुल्ल पटेल,स्थानिक आयोजन समितीचे प्रमुखइंग्लंड टीमच्या मदतीसाठी तयार : कॉन्स्टेंटाइन1भारताचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेंटाइन यांनी दावा केला आहे की, फुटबॉल महासंघाने त्यांना आगामी फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाच्या मदतीसाठी आग्रह धरला आहे. ते यासाठी तयारही आहेत.2कॉन्स्टेंटाइन यांच्या हवाल्याने एका वृत्तपत्राने म्हटले की, १७ वर्षांखालील विश्वचषक भारतात होत आहे. ‘एफए’ यांनी आदेश दिला आहे की मी संघाची मदत करावी. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करीन. भारताच्या वरिष्ठ संघाशी दुसऱ्यांदा जुळणाºया इंग्लंडच्या ५४ वर्षीय या प्रशिक्षकाने आपल्या देशात ओळख न मिळाल्याच्या कारणावरून नाराजी व्यक्त केली होती.3कॉन्स्टेंटाइन म्हणाले की, मी हे म्हणत नाही की मला इंग्लंडचा प्रशिक्षक बनवा; पण आपल्याकडे अशा काही व्यक्ती असतील की ज्या संघाला मदत करू शकतात, त्यांनी मदत करायला हवी. जर तुम्ही इंग्लंडचे आहात तर तुम्ही आपल्या संघासाठी मदत करायला हवी. फिफाचे इन्स्ट्रक्टर कॉन्स्टेंटाइन नेपाळ, मालदीव, सुदान आणि रवांडाचे प्रशिक्षक राहिले आहेत.