शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

FIFA U-17 World Cup : जर्मनी, कोस्टारिकाचे लक्ष नॉकआउट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 03:38 IST

गोव्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी (दि.७) दोन सामने रंगणार आहेत. त्यातील जर्मनी-कोस्टारिका या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सचिन कोरडेगोव्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी (दि.७) दोन सामने रंगणार आहेत. त्यातील जर्मनी-कोस्टारिका या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जर्मनी संघाला अनेकांनी पासंती दिली आहे. त्यामुळे या सामन्याविषयी उत्सुकता लागली आहे. १७ वर्षांखालील विश्वचषकात जर्मनीला आतापर्यंतही चॅम्पियन होता आले नाही. त्यामुळे भारतात विश्वचषक जिंकण्यासाठीच दाखल झाल्याचे त्यांच्या प्रशिक्षकांनी सांगितले. असे असले तरी आमचे पहिले लक्ष्य हे ‘नॉकआउट’ फेरीत प्रवेश करण्याचे असेल. असे सांगत जर्मनीचे प्रशिक्षक क्रिस्टियन कुक यांनी आपला इरादा स्पष्ट केला. दुसरीकडे, कोस्टारिकाचे प्रशिक्षक विकेज यांनीही ‘नॉकआउट’लाच प्राधाल्य असल्याचे म्हटले. बाद फेरीनंतर रणनीती आणि संघबदल पाहायला मिळतील. त्याआधी, आम्ही सर्वाेत्तम खेळ करत आमचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे विकेज म्हणाले.या स्पर्धेत जर्मनी दहा वेळा उतरलेला आहे; पण त्यांना विजेतेपद मिळवता आलेले नाही. गेल्या चार दिवसांपासून जर्मनीने गोव्यात सराव केला. येथील परिस्थितीशी जुळवून घेत आम्ही सर्वाेत्कृष्ट कामगिरी करू, आमचा संघ मजबूत आहे.ब्राझील-स्पेनकडे लक्षकोची : जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाºया ब्राझील-स्पेन या संघांच्या सामन्याकडे अनेकांचे लक्ष असेल. ब्राझील हा दक्षिण अमेरिकन चॅम्पियन आहे. तर युरोपियन क्वालिफाइंग विजेता म्हणून स्पेनने मान मिळवला आहे.नायझेरची विश्वचषकात ‘एन्ट्री’कोची : नायझेर संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झाला आहे. हा संघ प्रतिस्पर्धी संघांना आव्हान देण्यात माहीर असल्याचे मानले जात आहे. ड गटातील उ. कोरियाविरुद्ध नायझेर सज्ज झाला असून आपली एन्ट्री योग्य ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.गिनीविरुद्ध इराणने कसली कंबरआशियातील दिग्गज संघ म्हणून इराणची ओळख आहे. ‘क’ गटात विजयाने सुरुवात करण्यासाठी हा संघ तयार झाला आहे. गिनीविरुद्ध हा संघ कोणतीही संधी सोडणार नाही. प्रशिक्षक अब्बास चमनयान म्हणाले की, यापूर्वी आमचा संघ गोव्यात खेळलेला आहे. त्याचा फायदा आम्हाला होईल. १६ वर्षांखालील एएफसी चषकात आम्ही दुसºया क्रमांकावर होतो. या कामगिरीच्या बळावर आम्ही विश्वचषकासाठी पात्र ठरलो. खेळाडूंना याची जाण असून ते साजेशी कामगिरी करतील असा विश्वास आहे.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017FootballफुटबॉलSportsक्रीडाgoaगोवा