शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

FIFA U-17 World Cup : अमेरिकेविरुद्ध पराभवानंतरही भारतीय संघाने जिंकले मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 03:26 IST

भारतीय संघाला शनिवारी येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये १७ व्या फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत प्रबळ दावेदार मानले जाणाºया अमेरिकेकडून ०-३ गोलने पराभव पत्करावा लागला. तथापि...

नवी दिल्ली : भारतीय संघाला शनिवारी येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये १७ व्या फिफा अंडर १७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत प्रबळ दावेदार मानले जाणाºया अमेरिकेकडून ०-३ गोलने पराभव पत्करावा लागला. तथापि, पराभवानंतरही भारतीय संघाने आपल्या प्रेरणादायी कामगिरीने उपस्थितांची मने जिंकली. त्याचप्रमाणे फिफा स्पर्धेत सहभागी होणारा पहिला भारतीय संघही बनवत इतिहास रचला.

अमेरिकेकडून कर्णधार जोश सार्जेंटने पेनल्टीवर ३१ व्या मिनिटाला, ख्रिस डॉर्किनने ५२ व्या आणि अँड्र्यू कार्लटन याने ८४ मिनिटाला गोल केले.स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही आणि जसा चेंडू भारतीय खेळाडूंजवळ आला तसे त्यांना प्रेक्षकांचा जास्त पाठिंबा मिळत होता. त्याचा परिणाम खेळाडूंवरदेखील झालेला दिसला. भारतीय खेळाडूदेखील आपल्या पालक आणि प्रेक्षकांसमोर सर्वोत्तम कामगिरी करू इच्छित होते. त्यात गोलरक्षक धीरज मोईरांगथेम याच्याशिवाय कोमल थाटल आणि सुरेश वांगजाम व फॉरवर्ड अनिकेत जाधव यांची कामगिरी प्रशंसनीय ठरली.

सामन्याच्या प्रारंभीच गोलरक्षक धीरजने अमेरिकेचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. १५ व्या मिनिटाला मिडफिल्डर अँड्र्यू कार्लटनने मारलेल्या फटक्याचा धीरजने सुरेख बचाव केला. पाच मिनिटांनंतर राहुल कनोली याने अमेरिकेचा गोल करण्याचा प्रयत्न रोखला. तथापि, भारतीय खेळाडूच्या चुकीने अमेरिकेला पेनल्टी मिळाली आणि त्यावर जोश सार्जेंट याने गोल करीत अमेरिकेला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. ४३ व्या मिनिटाला अनिकेत जाधवला २५ यार्डवरून गोल करण्याची संधी मिळवली; परंतु तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. पूर्वार्धात अमेरिकेने १-0 अशी आघाडी घेतली; परंतु उत्तरार्धात त्यांनी सुरुवातीलाच आक्रमकता दाखवली. तथापि, अमेरिकेसाठी दुसरा गोल ५१ व्या मिनिटाला ख्रिस डॉर्कीन याने केला. त्यानंतर थाटलने दमदार फटका मारला; परंतु गोलरक्षक जस्टिन गार्सेस याला चकवण्यात त्याला यश मिळाले नाही. पुढच्याच मिनिटाला कार्लटनने गोल करीत अमेरिकेची आघाडी ३-० ने वाढवली. आता भारतीय संघ ९ आॅक्टोबरला कोलंबिया संघाविरुद्ध दोन हात करील.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017FootballफुटबॉलSportsक्रीडा