शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : जर्मनी जिंकली; पात्रतेची गुंतागुंत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:15 IST

जर्मनीच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित अवश्य केल्या आहेत; पण त्यासाठी त्यांना कोरियावर मात तर करावीच लागेल

रणजित दळवीमृत्यूशय्येवर शेवटचे काही श्वास घेणाऱ्या गतविजेत्या जर्मनीला तारले शेवटी त्यानेच! म्हणजे त्यांना मृत्यूच्या खाईत लोटणाºया टोनी क्रूसने. त्यानेच तो इंज्युरी टाईममधील गोल करून जर्मनीच्या शरीरात प्राण फुंकले. कदाचित हा त्याच्या आयुष्यातील फार मोठा क्षण ठरावा. त्याने जर्मनीच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित अवश्य केल्या आहेत; पण त्यासाठी त्यांना कोरियावर मात तर करावीच लागेल आणि त्याचबरोबर स्वीडन-मेक्सिको लढतीचा निकाल काय लागतो, हेही पाहावे लागेल. मात्र मध्यक्षेत्रात टोनी क्रूसची ती जीवघेणी चूक महागात पडली नाही, याबद्दल विधात्याचे आभारही मानावेत. टॉईव्होनेनचा तो गोल त्यांच्या गळ्यातले हाड नव्हता का बनला?जर्मनीचा हा विजय अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेला. जेरोम बोआटेंगने विनाकारण दुसºया पिवळ्या कार्डची आफत ओढवून घेतली आणि जवळजवळ पंधरा मिनिटे जर्मनीला दहा जणांनिशी खेळावे लागले. या गटातून अजून एकाही संघाचे भवितव्य निश्चित झालेले नाही. सर्वांना संधी आहे. स्वीडन, जर्मनी आणि मेक्सिको शेवटच्या लढतींच्या अंती सहा-सहा गुणांनिशी ‘टाय’ होऊ शकतात. येथे मग गोलफरक विचारात घेतला जाईल आणि समजा, जर्मनी आणि स्वीडन यांना हार पत्करावी लागली तर? आहे ना गुंतागुंत?जर्मनीचे प्रशिक्षक जोअकिम लो यांनी मेसुट ओझिलला बाकावर बसवून आपणच ‘बॉस’ आहोत हे सिद्ध केले. ओझिलने गटबाजीला खतपाणी घातल्याच्या अफवा पसरल्या होत्या, तेव्हा लो यांनी मुळावरच घाव घातला व मोठ्या संघर्षानंतर का होईना, त्यांचे आव्हान जिवंत राहिले. हा विजय जर्मनीचे मनोबल चांगलेच उंचावेल. विजेतेपदाच्या शर्यतीतील इतरांना हा मोठा इशारा आहे!स्वीडिश गोलवर सुरुवातीलाच एखाद्या आग्या मोहोळासारखा हल्लाबोल जर्मनीने केला व आपला इरादा दाखविला. ड्रॅक्सलर, किम्मीच, क्रूस, बोआटेंग, म्युलर यांनी प्रचंड दबाव टाकला, पण थोडी सदोष नेमबाजी आणि प्रतिस्पर्ध्यांच्या भिंतीला पाठ लावून बचाव यामुळे तो दबाव कमी होत गेला. त्यात एका अपघातामुळे रुडीचे नाक फुटले व त्यातून प्रचंड रक्तस्राव झाला. जवळजवळ पाच मिनिटे त्याच्या जागी बदली खेळाडू न आणल्याने स्वीडनला जर्मनीची खेळावरील मगरमिठी ढिली करण्यात यश आले.त्याआधीच त्यांच्यावरील पेनल्टीचे संकट टळले होते. स्वीडनच्या बर्गला बोआटेंगने पाठीत कोपर खुपसून खाली पाडले. बर्ग त्यावेळी गोल प्रयत्न करण्याच्या बेतात होता. पण अचानक झालेल्या प्रतिहल्ल्यामुळे त्या प्रसंगापासून ३०-३५ मीटर दूर असलेले पोलिश रेफरी झिमॉन मार्सिनिअ‍ॅक यांनी व्हिडीओची मदत का घेतली नाही? तेवढ्या अंतरावरून नेमके काय झाले, याचे अनुमान बांधता येते? आणि तेही जेव्हा आक्रमकाची पाठ, बचावपटूमुळेदिसू शकत नाही तेव्हा? याचे उत्तरआहे चक्क नाही! व्हिडीओ रेफरल उपलब्ध असताना ते का घेऊ नये? निर्णयामधील संदिग्धता, संशय दूर करण्यासाठीच तर ही योजना करण्यात आली!मारिओ गोमेझ आणि ज्युलियन ब्रँइट (८७ वे मिनिट) यांना उतरवून जर्मनीला फारसे काही साधले नाही. उंचापुरा बचावपटू आंद्रे ग्रॅनक्सिस्ट आणि अनुभवी गोलरक्षक रॉबिन ओलसन यांनी बजदरस्त बचाव केला. शेवटी बदली दुरमाझने जर्मनीच्या वेर्नरला शेवटच्या मिनिटात पाडले व स्वीडनचा घात झाला. टोनी क्रूसने मोठ्या हुशारीने ती दोन माणसांची भिंत हलेल हे पाहिले व तितक्याच कौशल्याने विजयी गोल डागला.या लढतीच्या आधी बेल्जियमने ट्युनिशियाविरुद्ध सराव सामना खेळत आहोत, या थाटात मोठा विजय मिळविला. आपली गोल करणारी यंत्रणा किती सक्षम आहे, ते त्यांनी दाखविलेच; पण आम्हीही शर्यतीतले मोठे स्पर्धक आहोत, हेही सहजपणे सिद्ध केले. प्रतिस्पर्ध्यांच्या गोलवर २२ हल्ले आणि डझनभर अचूक फटके यातच त्यांची दाहकता दिसली. इंग्लिश प्रीमिअर साखळीतले डझनभर खेळाडू, त्यात एडन हॅझार्ड आणिरोमेलू लुकाकू हे बचावपटूंचे कर्दनकाळ आणि राखीव बाकावर फेलिनी, मिग्बोलेट आणि कॉम्पनीसारखे दिग्गज, आली का लक्षात यांची ताकद?

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८