शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचा ‘नाटकीय’ विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 01:54 IST

खेळाच्या इतिहासामधील एक अविस्मरणीय ठरू शकणारी इंग्लंड आणि कोलंबिया यांच्यातील लढत अखेर एक फार्सच ठरली! खेळामध्ये कटुता तर आलीच पण सोबत पाहायला मिळाला अभूतपूर्व गोंधळ!

- रणजीत दळवीखेळाच्या इतिहासामधील एक अविस्मरणीय ठरू शकणारी इंग्लंड आणि कोलंबिया यांच्यातील लढत अखेर एक फार्सच ठरली! खेळामध्ये कटुता तर आलीच पण सोबत पाहायला मिळाला अभूतपूर्व गोंधळ! अमेरिकन रेफ्री मार्क गायगर यांना परिस्थिती नीटशी हाताळता न आल्याने खेळाडूंचा पारा चढला; शिवाय सामनाधिकाऱ्यांची नेमकी भूमिका, त्यांचा आपआपसांतील संपर्क तसेच सामंजस्य यातील अभाव आणि ‘व्हिएआर’ या वादग्रस्त प्रणालीमुळे होणारा निवडक हस्तक्षेप यामुळे परिस्थिती साफ बिघडली.एकूण अर्धा डझन कोलंबियन खेळाडूंना गायगर यांनी पिवळेकार्ड दाखविले. पण कर्णधार हॅरीकेन, हॅरी मॅग्वायर आणि जेस्सी लिनगार्ड अशा अनेक इंग्लिश खेळाडूंनी जेव्हा त्यांची दिशाभूल करताना जाणूनबुजून जमिनीवर लोळण घेतली तेव्हा त्यांचे हात थिजले आणि विचार शक्ती सुन्न झाली. शेवटी शेक्सपिअरचा वारसा लाभलेले इंग्रज ‘नाटक’ वठविण्यात यशस्वी झाले. सध्या नेमारचा विषय जोरदार चालू असताना इंग्लंडचा अख्खा संघच ब्राझीलियन नटसम्राटावर कडी करून गेला.या नाटकबाजीची सुरुवात अगदी सामना सुरू होताच झाली. इंग्लंडला गोलक्षेत्राच्या बाहेर फ्री किक मिळाली व तगड्या हेंडरसनने छोट्याशा विल्मार बॅरिओसला कळ काढली. त्याने मग हळूच त्याच्या छातीवर आणि हनुवटीवर डोक्याने हलकी टक्कर मारली. हेंडरसन ताबडतोब जमिनीवर विव्हळू लागला! त्यात गायगरनी मोठी चूक केली. ‘रिटॅलिएशन’साठी लाल कार्ड दाखवावे की कसे या विचारात त्यांनी फक्त पिवळे कार्ड दाखविले. त्यावर इंग्लिश खेळाडू भडकले. हेंडरसनला काही ‘नॉक आउट’चा ठोसा लागला नव्हता. गायगर यांनी दोघांना सज्जड दमही द्यायला हवा होता. गायगर यांनी आपले संतुलन गमावल्याचे चाणाक्ष इंग्लिश खेळाडूंनी हेरले व त्याचा फायदा घ्यायला सुरुवात केली.गायगर यांनी उत्तरार्धात सुरुवातीला इंग्लंडच्या केनला कार्लोस सांचेझने खाली पाडल्याचे निमित्त करत त्याला पेनल्टी बहाल केली. यात दोषी दोघेही होते. कुस्तीच चालली होती म्हणा ना! सांचेझला पिवळे कार्डही मिळाले. त्यापाठोपाठ त्यांनी कोलंबियाचा कर्णधार रॅडमेल फाल्कवलाही हुज्जत घातली म्हणून ‘बुक’ केले. यानंतर जमावाला पांगवताना, पोलिसांनी मिळेल त्याला चोपावे अशा थाटात गायगरनी कोलंबियाच्या पोरांना पिवळ्या कार्डाचा प्रसाद दिला. मग काय? प्रत्येकाने नाटकच करायचे ठरविले. जरासे लागले की ओरडायचे, कळवळत खाली पडायचे हे सतत होऊ लागले.कोलंबियाने त्या मानाने संयम राखला, डोकी शांत ठेवली. परिणामी, त्यांना सहा मिनिटांच्या ‘स्टॉपेज टाइम’च्या मध्यावर बरोबरीचा गोल मिळू शकला. मॅथेअस उरीबेचा ३० यार्डांवरून केलेला प्रयत्न इंग्लिश गोली जॉर्डन पिकफर्डने प्रेक्षणीयरीत्या विफल ठरविला. पण जो कॉर्नर मिळाला त्यावर यारी मिनाने जबरदस्त हेडरवर गोल केला. ट्युनिशिया - पनामासारख्या कमजोर प्रतिस्पर्ध्यांसमोर गुरगुरून हवा निर्माण केलेल्या इंग्लिश ‘लायन्स’ची कोलंबियाने चक्क हवा काढून टाकली.स्वीडर - स्वित्झर्लंड लढत कंटाळवाणी झाली. दोहोंकडे कौशल्याची कमी, त्यामुळे सुनियोजित खेळ करण्यात त्यांना अपयश आले. लांब पल्ल्याचे पास, त्यात अचूकतेचा अभाव. मग गोल होणार कसे? स्वित्झर्लंडला एकच सुवर्णसंधी होती. पण जेमायलीने स्टीव्हन झुबेरकडून मिळालेला चेंडू स्वैरपणे लाथाडला. तिकडे यॅन सॉमरने पूर्वार्धात मार्कुस बर्गचा फटका दूर लोटला. शेवटी शर्थीने लढणारा बचावपटू मॅन्युअल अकांजीने प्रतिस्पर्धी एमिल फॉर्सबर्गचा फटका अपघाताने आपल्याच गोलमध्ये वळविला आणि स्वित्झर्लंडची विश्वसैर संपुष्टात आली.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल