शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : 'त्या' खेळाडूंवर विसंबून राहणे संघाला महागात पडले... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 04:41 IST

जगातील सर्व क्लब आणि देशांच्या बचावपटूंना आपल्या तालावर नाचवणारे दोन दिग्गज खेळाडू शनिवारी विश्वचषक स्पर्धेतून रिकामी हाताने बाहेर पडले. त्यांच्या चाहत्यांना हे दु:ख पचवणे कठीण आहे.

सोची - जगातील सर्व क्लब आणि देशांच्या बचावपटूंना आपल्या तालावर नाचवणारे दोन दिग्गज खेळाडू शनिवारी विश्वचषक स्पर्धेतून रिकामी हाताने बाहेर पडले. त्यांच्या चाहत्यांना हे दु:ख पचवणे कठीण आहे. पण फुटबॉल खेळाची हीच खरी जादू आहे. इथे आधीच्या विक्रमापेक्षा त्या दिवशी तो खेळाडू कसा खेळतो यावर त्या संघाचा निकाल अवलंबून असतो. पण इथे केवळ एका खेळाडूवर विसंबून राहणे महागात पडू शकते. हा सांघिक खेळ आहे आणि येथे मैदानावरील सर्व अकरा खेळाडूंची सांघिक कामगिरी महत्वाची असते. हेच गणित अर्जेंटिना आणि पोर्तुगाल या संघांना सोडवणे जमले नाही. लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर अधिक विसंबून राहणे त्यांना महागात पडले. पण याला जर्मनीचा संघ अपवाद ठरला. सांघिक कामगिरीवर भर असलेला हा संघ साखळीतच बाहेर फेकला गेला. शनिवारी झालेल्या बाद फेरीच्या लढतीत फ्रान्सने अर्जेंटिनाचा (४-३), तर उरुग्वेने पोर्तुगालचा (२-१) असा पराभव केला. या पराभवाने त्यांचे स्पर्धेतील आव्हान बाद फेरीतच संपुष्टात आले. 

आर्जेंटिनाचा स्पर्धेपूर्वीचा आणि स्पर्धेतील प्रवास एकंदर चढ उताराचा राहिला. त्यात उतारच जास्त होता. त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा उरल्या नव्हत्या. पण अखेरचा (कदाचित) विश्वचषक खेळणाऱ्या मेस्सीकडून फार अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करण्यात तो अपयशी ठरला. अर्जेंटिनाने त्याच्यावरील भार कमी करण्यासाठी सामन्यात प्रयोग केले, परंतु अन्य खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी न झाल्याने पुन्हा सर्व भार मेस्सीच्या खांद्यावर आला. त्यामुळे पुन्हा अर्जेंटिना संपूर्णतः मेस्सीवर अवलंबून राहिली. साखळी फेरीत त्याने संघाला तारले. मात्र फ्रान्सच्या उत्तम सांघिक खेळासमोर पुन्हा ते अपयशी ठरले. मेस्सीने त्याची कामगिरी चोख बजावली. पण त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. 

पोर्तुगालच्या बाबतीतही हेच घडले. रोनाल्डोवर अतिविसंबून राहणे महागात पडले. स्पेनविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात हॅटट्रिक करणाऱ्या रोनाल्डोला रोखण्याची रणनीती सर्वच संघानी योग्यरितीने आखली होती. उरुग्वेविरूध्द तो निष्प्रभ ठरला.   उरुग्वेच्या बचावफळीने त्याला अचूक रणनीतीने रोखले आणि पोर्तुगालचा पराभव तेथेच निश्चित झाला.  रोलाल्डोसाठी अखेरची विश्वचषक स्पर्धा असल्याने त्याच्यावर आलेले दडपण त्यालाही झेपले नाही.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल