शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

फिफा शिष्टमंडळाची गोवा केंद्राला भेट! पुढील वर्षी होणार १७ वर्षांखालील विश्वचषक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 08:29 IST

२०१७ मध्ये फातोर्डा स्टेडिमवर फिफा १७ वर्षांखालील मुलांच्या  फुटबॉल स्पर्धांचे सामने झाले होते.

मडगाव :  भारतात पुढील वर्षी होणा-या  फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी देशातील पाच केंद्राची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या केंद्रांत गोव्याचाही समावेश आहे. फातोर्डा येथील  पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी फिफा शिष्टमंडळाने गुरुवारी केली. त्यांनी स्टेडियमच्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. केवळ ग्राऊंड पिच संदर्भात सुधारणा करण्यासाठी  फिफा शिष्टमंडळाचे प्रमुख ओली यांनी भेटीदरम्यान सूचित केले आहे.

फिफा शिष्टमंडळासोेबत गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, सागचे अभियंते अनील रेंगणे, फातोर्डा स्टेडियमचे सह व्यवस्थापक महेश रिवणकर, फातोर्डा स्टेडियमचे मुख्य अभियंते दीपक लोटलीकर  उपस्थित होते. त्यांनी फिफा दर्जानुसार ग्राऊंड आऊटफिल्डचा थर वाढविण्याची गरज असल्याचे तसेच प्लेयर्स रूम, रेफ्री रूम्स यांच्यात किंचीत बदल करण्याच्या सूचना केल्या. 

दरम्यान, २०१७ मध्ये फातोर्डा स्टेडिमवर फिफा १७ वर्षांखालील मुलांच्या  फुटबॉल स्पर्धांचे सामने झाले होते. त्यावेळी या स्टेडिमवर फिफा संघटनेच्या मागणीनुसार बदल करण्यात आले होते. त्याप्रमाणे २०२० मध्ये होणा-या फिफा विश्वचषक महिला १७ वर्षांखालील स्पर्धेसाठी कोणतेही जास्त बदल करण्याची आवशक्यता भासणार नसल्याचे स्टेडियमच्या अधिका-यांनी सांगितले. या शिष्टमंडळाने सरावासाठी राखीव असलेल्या बाणावली व ऊतोर्डा येथील मैदानांही यावेळेस भेट दिली. - फिफा १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर फिफाने भारतात दुस-यांदा महिला १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी पावले उचलली आहेत. स्पर्धा केंद्रांच्या पहिल्या टप्प्यातील भेटीत या शिष्टमंडळाने कोलकाता आणि गोवाच्या फातोर्डा स्टेडियमला अधिक पसंती दिलेली आहे.

टॅग्स :Footballफुटबॉलgoaगोवा