शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

FIFA Football World Cup 2018 : गच्छंतीची नामुष्की टळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 02:44 IST

विश्वचषक स्पर्धेतून गच्छंती टाळून अर्जेंटिनाने मोठी नामुष्की टाळली! त्यांच्या मदतीला अनपेक्षितपणे धावला मार्कोस रोहो! गेल्या लढतीत बाकावर बसल्यानंतर आज खेळावयाची संधी मिळालेल्या चारापैकी तो एक!

रणजित दळवीविश्वचषक स्पर्धेतून गच्छंती टाळून अर्जेंटिनाने मोठी नामुष्की टाळली! त्यांच्या मदतीला अनपेक्षितपणे धावला मार्कोस रोहो! गेल्या लढतीत बाकावर बसल्यानंतर आज खेळावयाची संधी मिळालेल्या चारापैकी तो एक! त्याने तो व्हॉली मारून केलेला गोल अप्रतिम याच्यासाठी, की त्याने तो लाथाडला उजव्या पायाने, जी गोष्ट तो क्वचितच करतो. त्याच्यापुढे एक प्रतिस्पर्धी मार्गात होता व वेळ होता क्षणार्धाचा. त्याच गोलने नायजेरियाची शौर्यगाथा संपुष्टात आणली. त्याच्या रुपाने अर्जेंटिनाला हीरो सापडला की भविष्यातला सुपरस्टार? या घडीला त्याच्यावर प्रकाशझोत अवश्य असला तरी त्याच्या आणि सहकाऱ्यांसमोर पुढचे आव्हान फारच मोठे आहे. फ्रान्स एक पक्का व्यावसायिक संघ आहे. सुनियोजितपणा, उत्तम डावपेच आणि नेमकाच आक्रमकपणा ही त्यांच्या खेळाची वैशिष्ट्ये आहेत. मेस्सीला पूर्वार्धात नायजेरियाने जी मोकळीक दिली ती फ्रान्स देणार नाही, हे काय सांगावयास हवे?नायजेरियाच्या बचावफळीतील दरार एव्हर बानेगाने हेरली आणि त्याने उंचावरून मेस्सीला अचूक पास दिला. तेव्हा तो चेंडू आपल्या डाव्या मांडीवर झेलल्यानंतर त्याने डाव्या चवड्यावर आणून नियंत्रित केला व एकाच दमात तो उजव्या पायाने लाथाडून गोलमध्ये वळविला. यात असली मेस्सीचे पुनश्च दर्शन झाले! मात्र उत्तरार्धात नायजेरियाने मध्यक्षेत्रात नियंत्रण प्रस्थापित करताच मेस्सी थंडावला आणि अर्जेंटिनाही. अचानक आफ्रिकन संघ आक्रमक झाला आणि प्रतिस्पर्धी सुमार दिसू लागला. त्यांनी टाकलेला दबाव फलदायी ठरला. अखिलाडूपणा नसानसांत भिनलेल्या माशेरानोने त्यांना पेनल्टी किकची भेट दिली. वय झाले आणि दम व ताकद कमी पडू लागल्यावर प्रतिस्पर्ध्यांना येनकेन प्रकारे रोखण्याशिवाय पर्याय असत नाही. तोच त्याने निवडला वव्हिक्टर माझेसने आरामात बरोबरी साधली. या सामन्याचे रेफरी झुनेत शाकिर यांनी सुरुवातीपासूनच खेळाची सूत्रे हाताबाहेर जाणार नाहीत, याची काळजी घेतली. त्यांनी पेनल्टी त्वरित दिली व तो निर्णय बरोबर असल्याची खातरजमादेखील व्हीएआरच्या मदतीने केली. माशेरानोच्या आर्जवांना त्यांनी असे उत्तर दिले.शाकिर यांनी अन्य वेळी जो संयम दाखविला तो वाखाणण्याजोगाच होता. जोरजोराने हातवारे करत वाद घालून चेंडू दूर फेकत तीव्र नापसंती व्यक्त करणाºया नायजेरियाच्या एटेबोला त्यांनी ज्या प्रकारे समजावले, तो क्षण इतर रेफरींना बरेच काही शिकविणारा होता.इतकेच काय, रोहोच्याविरोधात पेनल्टी न देण्याचा त्यांचा निर्णय फुटबॉलच्या कायदे-कानूनांविषयीचे त्यांचे सखोल ज्ञान व अर्थ लावण्याची क्षमता सिद्ध करून गेला. फार महत्त्वाचा निर्णय होता तो! चेंडूहेड केल्यानंतर तो त्याच्या हातावर घरंगळला होता. तो काही गोलच्या दिशेने जात नव्हता, की त्याच्याजवळ होता एखादा प्रतिस्पर्धी,ज्याला गोलसंधी मिळू शकलीअसती. यावर बराच खल होईल.पण खुर्चीत बसणाºया टीकाकारांना शाकिर खलनायकच वाटतील.खेळाडू खरोखरच जाणूनबुजून हाताने चेंडू खेळला की कसे, हे पाहणे महत्त्वाचे असते. उगीचच संशयावरून एखाद्या खेळाडूला फासावर लटकवायचे? आणि त्यामुळे अर्जेंटिनाची नाहक गच्छंती नसती झाली?आता अतिशय कठीण परिस्थितीतून बाहेर पडताना गोंधळलेल्या अवस्थेतील फ्रान्सविरुद्ध मुकाबला करायचा आहे. फ्रान्सने डेन्मार्कविरुद्ध आपल्या पहिल्या अकरातील नऊ जणांना विश्रांती दिली. केवढा विश्वास आपल्या राखीव क्षमतेवर? कालच्या लढतीत पुरती दमछाक झालेल्या आणि मानसिक ताण-तणावाखालील अर्जेंटिनाला हे आव्हान अतिशय जड जाणार हे निश्चित!

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८