शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

किंग्स चषक फुटबॉलसाठी ३७ संभाव्य खेळाडू जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 01:51 IST

भारतीय संघाचे शिबिर नवी दिल्लीत २० मेपासून सुरू होणार आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी जखमी स्ट्रायकर जेजे लालपेखलुआ याच्यासह पाच खेळाडूंना विश्रांती देण्यात आली.

नवी दिल्ली: पुढील महिन्यात थायलंडमध्ये आयोजित किंग्स चषक फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघातील ३७ संभाव्य खेळाडूंची घोषणा नवे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमाच यांनी गुरुवारी केली. भारतीय संघाचे शिबिर नवी दिल्लीत २० मेपासून सुरू होणार आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी जखमी स्ट्रायकर जेजे लालपेखलुआ याच्यासह पाच खेळाडूंना विश्रांती देण्यात आली.जेजे गुडघ्याच्या दुखापतीमुळे बुधवारी चेन्नईयन एफसीसाठी एएफसी चषकाचा सामना देखील खेळला नव्हता. मेच्या तिसºया आठवड्यात त्याच्या जखमेवर शस्त्रक्रिया केली जाईल. जेजेशिवाय हुलिचरण नरजारी याच्या गुडघ्याला दुखापत आहे. मंदार देसाईच्या मांसपेशी ताणल्या गेल्या, तर आशिक कुरियन व नरेंदर गहलोत यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.स्टिमाच यांनी हीरो आयलीग व आयएसएलमधील भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहून संभाव्य खेळाडूंना राष्ट्रीअ शिबिरासाठी पाचारण करण्यात आले. किंग्स चषकानंतर जुलैमध्ये आंतर कॉन्टिनेंटल चषक स्पर्धेचे आयोजन होईल.किंग्स चषक फुटबॉल स्पर्धा ‘फीफा’द्वारा मान्यताप्राप्त ‘अ’ दर्जाची आंतरराष्टÑीय स्पर्धा आहे. १९६८ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने याआधी १९७७ सालीआपला सहभाग नोंदवला होता. यंदा भारतापुढे थायलंड आणि व्हिएतनाम या संघांचे कडवे आव्हान राहील.भारतीय संभाव्य फुटबॉल संघगोलरक्षक : गुरप्रीतसिंग संधू, विशाल कैथ, अमरिंदरसिंग आणि कमलजीतसिंग.बचाव फळी : प्रीतम कोताल, निशु कुमार, राहुल भेके, सलाम रंजनसिंग, संदेश झिंगन, आदिल खान, अन्वर अली, शुभाशीष बोस व नारायण दास.मधली फळी : उदांतासिंग, जॅकीचंदसिंग, ब्रँडन फर्नांडिस, अनिरुद्ध थापा, रेनियर फर्नांडिस, बिक्रमजीतसिंग, धनपाल गणेश, प्रणय हलधर, रोलिन बोर्गेस, जर्मनप्रीतसिंग, विनित रॉय, सहल अब्दुल, अमरजीतसिंग, रीडीम तलांग, लालरिजुआला छांगटे, नंदा कुमार, कोमल थताल, मायकेल सूसइराज.आक्रमक फळी : बलवंतसिंग, सुनील छेत्री, जॉबी जस्टिन, सुमीत पासी, फारूख चौधरी व मनवीरसिंग.

टॅग्स :Footballफुटबॉल