शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेस्सीच्या गोलमुळे बार्सिलोना विजयी, चॅम्पियन्स लीगमध्ये युवेंट्सचा उडवला ३-० असा धुव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:02 IST

स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने केलेल्या २ गोलच्या जोरावर बार्सिलोना एफसी संघाने चॅम्पियन्स लीगमध्ये विजयी सुरुवात केली. मेस्सी मॅजिकच्या जोरावर बार्सिलोनाने युवेंट्सचा ३-० असा धुव्वा उडवला.

बार्सिलोना : स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने केलेल्या २ गोलच्या जोरावर बार्सिलोना एफसी संघाने चॅम्पियन्स लीगमध्ये विजयी सुरुवात केली. मेस्सी मॅजिकच्या जोरावर बार्सिलोनाने युवेंट्सचा ३-० असा धुव्वा उडवला.कॅम्प नाऊ स्टेडियममध्ये मंगळवारी रात्री झालेल्या या सामन्यात मेस्सीच्या धडाक्यापुढे युवेंट्सची बचावफळी पुर्ण खिळखिळी झाली. सामन्याचे पहिले सत्र जवळपास गोलशून्य बरोबरीत राहणार होते. मात्र, पहिले सत्र संपण्यास काही सेकंद शिल्लक असतानाच ४५ व्या मिनिटाला मेस्सीने गोल करत संघाला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर दुस-या सत्रात बार्सिलोनाने आणखी आक्रमक पवित्रा घेतला. या वेळी, इवान रेकिटिन याने ५६ व्या मिनिटाला गोल करताना संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. दोन गोलच्या पिछाडीमुळे युवेंट्स संघावरील दडपण स्पष्ट जाणवू लागले. यातूनच त्यांच्याकडून काही चुकाही होऊ लागल्या. याचा अचूक फायदा घेत मेस्सीने पुन्हा सगळी सूत्रे आपल्याकडे घेत ६९ व्या मिनिटाला तिसरा गोल करून बार्सिलोनाला ३-० अशी एकतर्फी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना बार्सिलोनाने यंदाच्या मोसमाची विजयी सुरुवात करताना दिमाखदार सलामी दिली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा