शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बाई अवबाई पेटिट संघ उपांत्य फेरीत, युथ स्पोर्टस  फुटबॉल; फादर अ‍ॅग्नेलचीही कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 04:57 IST

बाई अवबाई पेटिट गर्ल्स हायस्कूल आणि फादर अ‍ॅग्नेल मल्टिपर्पज स्कूल अ‍ॅण्ड ज्यूनिअर कॉलेज या संघांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना युथ स्पोटर््स फुटबॉल स्पर्धेच्या मुलींच्या गटाची उपउपांत्य फेरी गाठली.

मुंबई : बाई अवबाई पेटिट गर्ल्स हायस्कूल आणि फादर अ‍ॅग्नेल मल्टिपर्पज स्कूल अ‍ॅण्ड ज्यूनिअर कॉलेज या संघांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना युथ स्पोटर््स फुटबॉल स्पर्धेच्या मुलींच्या गटाची उपउपांत्य फेरी गाठली. दोन्ही संघांनी एकतर्फी झालेल्या लढतीत दणदणीत विजयाची नोंद केली.घणसोली येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात झालेल्या सामन्यात बाई अवबाई संघाने तुफानी खेळ करताना सानपाडाच्या रायन इंटरनॅशन स्कूलचा १०-० असा फडशा पाडला. दिनाझ पार्से सरकारी हिने शानदार खेळ करताना चार गोल करत बाई अवबाई संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पहिल्या सत्रात एक गोल केल्यानंतर तिने दुसºया सत्रात हॅट्ट्रीक नोंदवत रायन संघाला दबावाखाली आणले. त्याचवेळी झेनिया जमशेदजी, अल्ला कोल्हा यांनीही प्रत्येकी २ गोल करत चांगला खेळ केला. रुकसाना ईला, अनुबेन जीवसा यांनी प्रत्येकी एक गोल करत रायन स्कूलचा पराभव निश्चित केला.फादर अ‍ॅग्नेल संघानेही धमाकेदार विजयाची नोंद करताना चर्चगेटच्या किशनचंद चेलाराम (के.सी.) कॉलेजचा ८-० असा धुव्वा उडवला. अप्रतिम सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना फादर अ‍ॅग्नेल संघाने के. सी. कॉलेजला सहज नमवले. आकांक्षा कांदळकरने ४ गोल करत वर्चस्व राखले. सृथीलक्ष्मी वेदाकेकरमल, अर्मनिथ कामत, सिद्धि मोरे आणि धृती शेट्टी यांनीही प्रत्येकी एक गोल करत चमक दाखवली.मुलांच्या ज्यूनिअर गटात बलाढ्य डॉन बॉस्कोने (माटुंगा) बालमोहन विद्यामंदिर (इंग्रजी) संघाचा १०-० असा धुव्वा उडवला. मध्यंतरालाच डॉन बॉस्कोने ५-० अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. 

टॅग्स :Footballफुटबॉल