शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

गोल नोंदविल्यानंतर अतिउत्साही जल्लोष आवडत नाही - छेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:59 IST

चायनिज तायपेईवर भारताच्या ५-० ने विजयात करिअरमध्ये तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक नोंदविणारा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री विजयाचा उन्माद करताना दिसला नाही. कितीही आनंदी झालो तरी अतिउत्साही जल्लोष मला आवडत नसल्याचे छेत्रीने सामन्यानंतर स्पष्ट केले.

मुंबई : चायनिज तायपेईवर भारताच्या ५-० ने विजयात करिअरमध्ये तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक नोंदविणारा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री विजयाचा उन्माद करताना दिसला नाही. कितीही आनंदी झालो तरी अतिउत्साही जल्लोष मला आवडत नसल्याचे छेत्रीने सामन्यानंतर स्पष्ट केले.अंधेरी क्रीडा संकुलात रंगलेल्या या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारला. १४व्या मिनिटाला जेजे लालपेखलुआने केलेल्या सुरेख पासच्या जोरावर छेत्रीने गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली. ३४व्या मिनिटाला जेजे आणि छेत्रीच्या जोडीने पुन्हा एकदा कमाल दाखवली व छेत्रीने गोलजाळ्याच्या अगदी डाव्या कोपºयात चेंडू मारून दुसरा गोल केला. ६२व्या मिनिटाला २० वर्षीय अनिरुद्ध थापाने दिलेल्या सुरेख पासचे गोलमध्ये रूपांतर करून छेत्रीने हॅट्ट्रिक साधली. छेत्री परतत असताना संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याने या अभिवादनाचा स्वीकार केला. हा छेत्रीचा ९९ वा आंतरराष्टÑीय सामना होता. त्याच्या नावावर ५९ गोल झाले आहेत.सामन्यानंतर तो म्हणाला,‘गोल करतो तेव्हा मोठा आनंद होतो. क्लब आणि देशासाठी इतके गोल करण्याचा मला मान मिळाला. मी अतिउत्साही होत नाही. मी गोल नोंदविण्यासाठी सारखा धडपडत असतो. एएफसी आशिया चषकात बहारिनविरुद्ध गोल झाल्यास मी जोरदार जल्लोष करणार आहे. आशियाई चषक किंवा आशियाडमध्ये झालेला गोल महत्त्वपूर्ण असल्याने अशा गोलनंतर आनंद साजरा करायला हवा. त्यावेळी सहकाºयांची गळाभेट घेणे मलाही आवडेल. पण हॅट्ट्रिक नोंदविल्याचा देखील मला आनंद आहे.’ भारताचा पुढील सामना छेत्रीचा शंभरावा आंतरराष्टÑीय सामना असेल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Footballफुटबॉल