शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

मायक्रोवेव वापरल्यानं जडू शकतात गंभीर आजार. अभ्यासक म्हणतात मायक्रोवेव काळजीपूर्वकच वापरायला हवा!

By madhuri.pethkar | Published: November 10, 2017 6:17 PM

मायक्रोवेवचा उपयोग आणि फायदे वादातीत असताना मायक्रोवेवच्या परिणामांचा अभ्यासही जोरात सुरू आहे. असाच एक अभ्यास नुकताच प्रसिध्द झाला आहे. हा अभ्यास मायक्रोवेवचा उपयोग अगदी जपून करायला सांगतो. या अभ्यासाच्या मते कळणा-या, न कळणा-या,किरकोळ-गंभीर अशा अनेक आजारांचं मूळ मायक्रोवेव ठरू शकतो.

ठळक मुद्दे* ज्या विकिरणांच्या प्रक्रियेमुळे मायक्रोवेवमध्ये पदार्थ झटपट गरम होतात त्या विकिरणांमुळ पदार्थांभोवती किरणोत्साराचा वेढा निर्माण होतो ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.* मायक्रोवेवची रचना, कार्यपध्दती आणि मायक्रोवेव वापरण्याच्या पध्दती यांचा अभ्यास करून अभ्यासकांनी मायक्रोवेव आरोग्यास कसा घातक आहे हे सूचित केलं आहे.* खरंतर मायक्रोवेव चुकीच्या पध्दतीनं वापरल्यानंही तोटा होतो. म्हणून मायक्रोवेव जर योग्य पध्दतीनं वापरला तर मायक्रोवेवचे घातक परिणाम आपण सहज कमी करू शकतो असं अभ्यासकांचं मत आहे.

- माधुरी पेठकर

मायक्रोवेव हे सध्याच्या काळात स्वयंपाकघरात लागणारं महत्त्वाचं साधन आहे. प्रेस्टिज आणि गरज अशा दोन्ही कारणांसाठी प्रत्येकीला मायक्रोवेव स्वयंपाकघरात हवाच असतो. कमीत कमी वेळ आणि ऊर्जेमध्ये अन्न शिजवणंआणि गरम करण्यासाठी मायक्रोवेव अतिशय उपयुक्त ठरतो. पाणी उकळणे, दूध गरम करण्यापासून ते दोन मिनिटातली मॅगी आणखी झट की पट करण्यासाठी , पॉपकॉर्न भाजण्यासाठी अशा अनेक छोट्यामोठ्या कारणांसाठे मायक्रोवेव वापरला जातो.मायक्रोवेवचा उपयोग आणि फायदे वादातीत असताना मायक्रोवेवच्या परिणामांचा अभ्यासही जोरात सुरू आहे. असाच एक अभ्यास नुकताच प्रसिध्द झाला आहे. हा अभ्यास मायक्रोवेवचा उपयोग अगदी जपून करायला सांगतो. या अभ्यासाच्या मते कळणा-या, न कळणा-या,किरकोळ-गंभीर अशा अनेक आजारांचं मूळ मायक्रोवेव ठरू शकतो. एका स्वीस वैज्ञानिकानं केलेल्या अभ्यासात त्यांना असं आढळून आलं आहे की मायक्रोवेवमध्ये अन्न शिजवताना अन्नाचा कस कमी होतो. ज्या विकिरणांच्या प्रक्रियेमुळे मायक्रोवेवमध्ये पदार्थ झटपट गरम होतात त्या विकिरणांमुळ पदार्थांभोवती किरणोत्साराचा वेढा निर्माण होतो ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

मायक्रोवेव वापरताना तो जेव्हा सुरू केला जातो तेव्हा लगेच छोट्या छोट्या विद्युत लहरी मायक्रोवेवमध्ये फिरू लागतात. या विद्युत लहरी मायक्रोवेवमध्ये विद्युतचुंबकीय विकिरण घडवून आणतात. या लहरी जोर जोरात कंप पावतात. एका मिनिटात 2,500 मेगाहर्टझ इतका त्यांचा प्रचंड वेग असतो. हा वेग आपण जो मोबाइल वापरतो त्या मोबाइलमधील लहरीही एवढ्याच वेगानं काम करत असतात.

मायक्रोवेवची रचना, कार्यपध्दती आणि मायक्रोवेव वापरण्याच्या पध्दती यांचा अभ्यास करून अभ्यासकांनी मायक्रोवेव आरोग्यास कसा घातक आहे हे सूचित केलं आहे. अभ्यासकांच्या मते मायक्रोवेवमधील अन्न सतात खाल्ल्यानं रोगप्रतिकारकशक्ती कमी होवू शकते. मायक्रोवेवच्या अतिवापरानं कर्करोगासारखे दुर्धर आजार होतात. विषाणू आणि संसर्गाशी लढण्याच्या प्रतिकारक्षमतेवर मायक्रोवेव परिणाम करतो. मायक्रोवेव अन्नातला कस कमी करतो तर मायक्रोवेव सतत वापरणाºयांच्या रक्तातील साखरही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं आहे.अभ्यासकांनी मायक्रोवेवच्या या घातक परिणामांवर आपल्या अभ्यासातून प्रकाश टाकला आहे. पण याचा अर्थ मायक्रोवेव वापरायचाच नाही असं नाही. खरंतर मायक्रोवेव चुकीच्या पध्दतीनं वापरल्यानंही तोटा होतो. म्हणून मायक्रोवेव जर योग्य पध्दतीनं वापरला तर मायक्रोवेवचे घातक परिणाम आपण सहज कमी करू शकतो असं अभ्यासकांचं मत आहे.

मायक्रोवेव कसा वापरावा?

* मायक्रोवेवची स्थिती उत्तम असायला हवी.* मायक्रोवेवमध्ये अन्न गरम करताना किंवा तयार करताना खास मायक्रोवेव सेफ कंटेनरचाच उपयोग करायला हवा.* लहान बाळांचं अन्न मायक्रोवेवमध्ये करणं टाळायला हवं.* द्रव पदार्थ मायक्रोवेवमध्ये गरम करताना कायम एक काळजी घ्यायला हवी की हे पदार्थ अजिबात उकळता कामा नये.* निर्धारित वेळेपेक्षा मायक्रोवेवमध्ये जास्त वेळ पदार्थ गरम करू नये किंव ठेवू नये.* मायक्रोवेवचा उपयोग भाजा शिजवण्यासाठी करावा. मांसाहारी पदार्थ गरम करण्यासाठी मायक्रोवेवचा उपयोग करू नये.* ब-याचदा नोकरी करणा-या महिला लहान बाळासाठी आपलं दूध काढून ठेवतात आणि मायक्रोवेवमध्ये कोमट करून मुलांना पाजतात ही अत्यंत चुकीची पद्धत आहे.* मायक्रोवेवमध्ये पाणी गरम करू नये किंवा कोणताही द्रवपदार्थ मायक्रोवेवमध्ये गरम करू नये.मायक्रोवेव वापरताना एवढी जरी काळजी घेतली तरी मायक्रोवेव आरोग्यास घातक न ठरता फायदेशीर ठरू शकतो.