शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Sankashti Chaturthi 2022: एखाद्या गृहिणीलाही लाजवेल एवढे सुबक, सुंदर मोदक बनवणारा अवलिया मयूर गोलतकर!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: November 12, 2022 12:24 IST

Sankashti Chaturthi 2022: आज संकष्टी, त्यानिमित्ताने जाणून घेऊया रसिकतेने मोदक बनवणाऱ्या एका कलाकाराची गोष्ट!

>> ज्योत्स्ना गाडगीळ

मोदक हा बाप्पासकट आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय! मोदक खाणं हे जितकं सुखावह, तेवढीच त्याची निर्मिती पाहणं हा सुखद अनुभव असतो. हा मोद देणारा एक कलाकार, मयूर गोलतकर. 

मयूर मोदक मॅन म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. त्याच्या नावापेक्षा त्याच कामच जास्त बोलतं. अशी काय आहे त्याची खासियत? ते लेखाला जोडलेल्या फोटोवरून लक्षात येईलच. सुंदर, सुबक, पांढरे शुभ्र, गुटगुटीत आणि छोटंसं नाक काढलेले मोदक ही मयूरची सिग्नेचर रेसेपी आहे. तो काही शेफ नाही की हॉटेल व्यवसायात अनुभव घेतलेला मुलगा नाही. कांदिवलीच्या ठाकूर इन्स्टिट्यूटमधून त्याने एमबीए केलं आणि एका प्रतिष्ठित कंपनीत तो उच्चपदावर कार्यरत आहे. तरीसुद्धा पाकसिद्धीचा छंद तो अजूनही जोपासतो आणि इतरांना खाऊ घालण्यात धन्यता मानतो. 

मोदकनिर्मिती हा विषय कोकणातल्या मंडळींसाठी नवीन नाही. मयूरसुद्धा मूळचा कोकणातला. मात्र सगळे नातेवाईक मुंबईकर असल्याने त्या सर्वांनी मुंबईतच कोकणातली खाद्यसंस्कृती रुजवली. मयूरच्या वडिलांना नोकरी सांभाळून जेवणाच्या ऑर्डर घेण्याची आवड होती. ते स्वतः उत्तम स्वयंपाक करायचे. आई तर साक्षात अन्नपूर्णा. तिच्या हातच्या वेगवेगळ्या पाककृतींचे अनेक जण चाहते आहेत. मेथी लाडू, डिंक लाडू, चकल्या, चिवडा, अळू वडीला स्पेशल डिमांड असे. मोठ्या बहिणीला स्वयंपाकाची विशेष आवड नव्हती पण लग्नानंतर तीसुद्धा चांगली सुगरण झाली. एकूणच घरावर अन्नपूर्णेचा वरदहस्त आहे म्हटल्यावर मयूर तरी कसा अलिप्त राहणार होता? आईला मदत करता करता त्याची स्वयंपाकात रुची वाढू लागली. आईनेही वेळोवेळी प्रोत्साहन दिलं आणि वेगवेगळे खाद्यप्रयोग सुरू झाले. कॉलेजमध्ये डब्यात त्याने बनवून नेलेले पदार्थ काही मिनिटांत संप्लवन पावत असत. शिवाय विविध पदार्थांची फर्माईशदेखील होत असे.

बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट करावं अशी मयूरची इच्छा होती, पण त्याने उच्चशिक्षण घ्यावं अशी घरच्यांची इच्छा होती. त्याने ती पूर्ण केली. नोकरीलाही लागला. हे सर्व करताना विरंगुळा म्हणून खाणे आणि खिलवणे यात कुठेही खंड पडू दिला नाही. सरावातून त्याला अनेक पदार्थ बनवता येऊ लागले, मात्र त्याला खरी ओळख दिली ती उकडीच्या मोदकाने!

मयूर सांगतो, 'दर संकष्टीला आई उकडीचे मोदक करायची. तिला मदत करता करता मोदक कसे करायचे ते शिकलो. फोटोग्राफीची आवड होतीच. फोटो सेन्सही चांगला होता. मोदकांचे आकर्षक फोटो काढण्यासाठी त्याचा उपयोग झाला. सोशल मीडियावर त्या फोटोंना खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. एक दिवस मित्राने, '५० मोदकांची ऑर्डर घेशील का' म्हणून विचारलं. गंमत म्हणून ते आव्हान मी स्वीकारलं आणि आईवर ताण पडू नये म्हणून नारळ खवण्यापासून मोदक बनवण्यापर्यंत आणि पसारा आवरण्यापासून डिलिव्हरी देण्यापर्यंत सगळी कामं एकहाती केली. ऑर्डर पूर्ण केली. फोटो काढले. खाणाऱ्यांकडून आणि फोटो पाहणाऱ्यांकडून वाहवा मिळाली, 'माझ्यापेक्षा तुझे मोदक सुंदर झालेत', असं आईकडून प्रमाणपत्र मिळालं, तेव्हा माझा आत्मविश्वास दुणावला. तेव्हापासून दर संकष्टीला मोदकांच्या ऑर्डर सुरू झाल्या. हे काम करण्यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही. उलट मोदक करणं हे अत्यंत कौशल्यपूर्ण काम आहे, असं मी समजतो आणि माझ्याप्रमाणेच इतरांच्या सुंदर पाककृतींचं खुल्या दिलाने कौतुक करतो. हे माझ्यासाठी कमाईचं साधन नाही तर हा आनंदाचा ठेवा आहे. असं असलं तरी आपल्याला एकट्याने करता येतील एवढ्याच मोदकांची ऑर्डर घेतो. कारण या कामात मला इतर कोणाची लुडबुड आवडत नाही. मोदक एकसारखे व्हावेत यासाठी मी आग्रही असतो. तोच माझा रियाज असतो, ध्यानधारणा असते आणि आत्मानंदही असतो!' 

लॉकडाऊन काळात मयूरचं मोदकप्रेम नावारूपाला आलं. त्याने ऑनलाईन मोदक बनवण्याची मोफत कार्यशाळा घेतली. त्याच्या सगळ्या बॅचला उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेत त्याने उकडीचे, तळणीचे, गुलकंदाचे मोदक शिकवले. त्यातला एक व्हिडीओ एवढा व्हायरल झाला, की काही काळातच इंस्टाग्रामवर त्याचे ४००० चे १०,००० फॉलोवर्स झाले. सतरा लाख व्हीव्ह्ज आणि हजारो शेअर मिळाले, कमेंट्समधून कौतुकाचा वर्षाव झाला. एवढंच नाही, तर मोदक आणि मयूर हे समीकरण तयार झालं. ऑर्डर वाढल्या. सुकन्या मोने, अपर्णा सुनील बर्वे यांसारख्या कलाकारांच्या घरून कौतुकाची थाप मिळाली. खुद्द ज्ञानदाने देखील गणेशोत्सवात एबीपी माझा वर मोदक शिकवशील का म्हणत, काय सांगशील मयूर? अशी विचारणा केली. मयूर टीव्हीवर झळकला.

आता फक्त संकष्टीपुरते नाही, तर कोणत्याही सण समारंभाच्या निमित्ताने लोकांकडून मोदकांची मागणी होते आणि मयूर वेळेचं नियोजन करून खवय्यांना मोदकाचा आस्वाद घेण्याची संधी मिळवून देतो. केवळ मराठीच नाही तर अमराठी लोकही मयूरच्या मोदकाचे चाहते आहेत. अनुभवातून आणि लोकांच्या सुचनांवरून मोदक व्यवसायात मयूर तरबेज होत गेला. मुंबई परिसरात ऑर्डर पोहोचवण्यासाठी तो फूड डिलिव्हरी सर्व्हिसचीही मदत घेतो. भविष्यात त्याला या व्यवसायाशी संबंधित प्रशिक्षण घेण्याची इच्छा आहे, मात्र पूर्णवेळ खाद्य व्यवसायात उतरण्याचा सध्या तरी त्याचा मानस नाही. 

नोकरीमुळे वेळ मिळत नाही, छंद जोपासता येत नाही, अशी आपण सबब देतो. एखादे काम करताना लोक काय म्हणतील याचा विचार करतो. पण या विचारांच्या पल्याड जाऊन मयूर या सगळ्या गोष्टी आनंदाने करतो आणि आपल्या कलेतून दुसऱ्यांनाही आनंद देतो, ही बाब कौतुकास्पद आहे. कारणं देण्यापेक्षा कोणाच्या आनंदाचं कारण बनणं चांगलं, नाही का? त्याच्यावर बाप्पाचा आशीर्वाद कायम राहो आणि उत्तरोत्तर त्याची प्रगती होत राहो, हीच मयूरला सदिच्छा!

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीfoodअन्न