शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सणावाराला खिशाला चाट न बसण्यासाठी काही गोष्टी आपण अतिशय काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2022 13:30 IST

आपल्याकडे सणावारांची काहीच कमतरता नाही. साधारण गणेशोत्सवापासून मोठमोठ्या सणांची जी सुरुवात होते, ती साधारण वर्षअखेर म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत सुरूच असते.

आपल्याकडे सणावारांची काहीच कमतरता नाही. साधारण गणेशोत्सवापासून मोठमोठ्या सणांची जी सुरुवात होते, ती साधारण वर्षअखेर म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत सुरूच असते. हे सगळे उत्सव आपण अतिशय उत्साहात साजरे करतो. ते केलेही पाहिजेत; पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, की हे सण आपल्या आनंदासाठी असतात. त्यातून आपल्याला आनंदच मिळाला पाहिजे. नंतर त्याचं आर्थिक दडपण आपल्यावर यायला नको. त्यासाठी काही गोष्टी आपण अतिशय काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. तर आपल्यासाठीही हे सारे सण अतिशय आनंदाचे जातील. त्यासाठीच्या या काही युक्त्या. 

१- सणासुदीला काही खर्च अत्यावश्यक असतात. ते आपल्याला टाळता येत नाही. किराणा, गोडधोड, नवे कपडे, भेटवस्तू आदी. याशिवाय ठरवून काही गोष्टीही आपण खरेदी करतो. उदाहरणार्थ सोनं, चांदी, कार, वॉशिंग मशीन वगैरे. या साऱ्या गोष्टींची वेगवेगळी यादी तयार करा आणि त्यानुसार आपल्या पैशाचं व्यवस्थापन करा.२- सर्वात आधी आपल्या बँकेचा, म्हणजे आपल्या खिशाचा सल्ला घ्या. त्यात कोणत्या गोष्टी येऊ शकतात, हे तपासा. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची नोंद करा. त्यात कोणत्या गोष्टीवर तुम्ही किती खर्च करू शकता, हे लिहून काढा.३- शक्य झालं तर एक गोष्ट आवर्जून करा, ती म्हणजे सणासुदीसाठी एक स्वतंत्र बँक अकाऊंट तयार करा. त्यात सणांसाठी लागणारे पैसे जमा करत चला. म्हणजे आपल्याकडे प्रत्यक्षात किती पैसे जमा आहेत आणि त्यात कोणत्या गोष्टीवर आपण किती खर्च करू शकतो, याचा नेमका अंदाज आपल्याला येईल. ४- सणासुदीच्या काळात वेगवेगळ्या ऑफर्स येतात; पण आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्याच आहेत, (फक्त) त्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करा. ज्या वस्तूंवर मोठी सवलत आहे, कॅश बॅक आहे अशा वस्तूंची क्वॉलिटीही चेक करून घ्या आणि स्वस्तात त्या वस्तू मिळवा.५- आणखी एक सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘पर्सनल लोन’च्या मोहात पडू नका. ज्या वस्तू आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत, त्याही अशा कर्जामुळे आपल्या आवाक्यातल्या वाटायला लागतात; पण या सापळ्यात अडकू नका.

टॅग्स :foodअन्न