शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलसारखे फ्रेंच फ्राईज आता घरी करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 18:41 IST

फ्राईज अर्थात फिंगर चिप्स सगळ्यांना आवडतात. पण हॉटेलसारखे होत नाही अशी तक्रारही असते. पण आता काळजी नको, आम्ही देत आहोत फ्रेंच फ्राईजची अशी रेसिपी जी तुम्हाला हॉटेलची आठवणही येऊ देणार नाही. 

फ्रेंच फ्राईज अर्थात फिंगर चिप्स सगळ्यांना आवडतात. पण हॉटेलसारखे होत नाही अशी तक्रारही असते. पण आता काळजी नको, आम्ही देत आहोत फ्रेंच फ्राईजची अशी रेसिपी जी तुम्हाला हॉटेलची आठवणही येऊ देणार नाही. 

साहित्य : 

बटाटे 

तेल 

मीठ 

कृती :

बटाटा सोलून त्याचे उभे मध्यम जाड काप करून घ्या. हे काप शक्यता एकसारखे असावेत म्हणजे सारखे तळले जातात. 

बटाट्याचे काप कोमट पाण्यात टाकावेत. त्यामुळे ते काळे पडत नाहीत आणि स्टार्च कमी होण्यात मदत होते. 

गॅसवर पाणी गरम करून त्यात पाव चमचा मीठ घालावे. पाणी उकळल्यावर त्यात बटाट्याचे काप घालून झाकण ठेवावे व गॅस बंद करावा. 

पाच मिनिटांनी पाणी काढून बटाट्याचे काप कॉटनच्या कापडावर कोरडे करून घ्यावेत. 

हे काप गार झाल्यावर एक तास फ्रीजमध्ये ठेवावेत. 

गॅसवर कढईत पुरेसे (काप बुडतील इतके) तेल घेऊन ते तापवावे. तापल्यावर गॅस मध्यम ठेवून काप तळावेत. तळताना गॅस फार लहान किंवा मोठा नसावा. 

एकसारखे टाळून रंग बदलायला लागल्यावर काप खाली काढावेत. तेल  निथळल्यावर सर्व्ह करण्यापूर्वी पुन्हा एकदा तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळावेत. 

गरमागरम फ्रेंच फ्राईज तयार. चवीपुरते मीठ टाकून खाण्यास घ्यावेत. यात तयार चाट मसाला, लाल तिखट, आमचूर पावडर किंवा पेरीपेरी मसाला आवडत असल्यास टाकता येईल. सॉस किंवा मेयॉनिजसोबत हे उत्तम लागतील. 

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती