वेगवेगळे डेजर्ट्स आणि आइस्क्रीम दिसायला एकसारख्या दिसतात पण मुळात दोन्हींमध्ये बराच फरक असतो. आइस्क्रीम, जेलाटो, फ्रोजन कस्टर्ड आणि फ्रोजन योगर्टसारखे डेजर्ट्स दिसायला जवळपास सारखेच असतात. पण वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे पदार्थ वेगळे ठरतात. हा फरक अनेकांना माहितच नसतो. नेमका हा फरक काय असतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आइस्क्रीम
एका आइस्क्रीममध्ये वापरल्या जाणाऱ्या दुधाचं प्रमाण आइस्क्रीमला इतर डेजर्टपासून वेगळं ठरवतं. एका रिसर्चनुसार, आइस्क्रीममध्ये १० टक्के मिल्कफॅट असतं. हे गोठवताना फेटणं फार गरजेचं असतं. तसेच त्यावेळी यात हवा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. जर फेटताना आइस्कीम बेसमध्ये जास्त हवा गेली तर सॉल्यूशन तयार होईल आणि आइस्क्रीम हलकी आणि नरम होईल.
जेलाटो
आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांना जेलाटो आणि आइस्क्रीममधील फरक माहीत नसतो. आधी सांगितल्याप्रमाणे आइस्क्रीम तयार करताना त्यात असलेल्या हवेमुळे आइस्क्रीमचं सॉल्यूशन वेगळं होतं. जेलाटोसोबतही हेच होतं. जेलाटोला फेटताना त्यात १० ते २० टक्केच हवा येऊ शकते. ज्यामुळे जेलाटो फार घट्ट होतं. अनेक ठिकाणी जेलाटो केवळ दुधापासून तयार करण्यात येतं आणि त्यात क्रीम मिश्रित केलं जात नाही.
फ्रोजन योगर्ट
जेव्हा योगर्ट दुधाच्या आइस्क्रीम बेस, फ्रेश क्रीम आणि आर्टिफिशिअल स्वीटनरसोबत ब्लेंड केलं जातं, तेव्हा फ्रोजन योगर्ट तयार होता. हे स्वीट, टॅगी आणि क्रीमी असतं. फ्रोजन योगर्ट पचनक्रियेसाठी फारच हेल्दी असतं. कारण यातून पचनक्रियेसाठी फायदेशीर बॅक्टेरिया वाढतात.
फ्रोजन कस्टर्ड
अनेक लोक याला फ्रेन्च आइस्क्रीमच समजतात. एक्सपर्टनुसार, फ्रोजन कस्टर्ड आइस्क्रीमशी फार मिळतं जुळतं असतं. पण आइस्क्रीम नसतं. मात्र यात असलेल्या पदार्थांमुळे आणि हे तयार होण्यासाठी लागणाऱ्या वेळामुळे हा पदार्थ इतर आइस्क्रीमपेक्षा वेगळा ठरतो. एक कप फ्रोजन योगर्टमध्ये १.४ टक्के एग योक आणि १५ ते ३० टक्के हवा असते. त्यामुळे हे आइस्क्रीमच्या तुलनेत अधिक मुलायम असतं.