शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

ऐश्वर्या, करिना, दीपिका आणि हेमामालिनी सुंदर दिसण्यासाठी पाळतात खाण्या-पिण्याचे नियम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:51 IST

-सारिका पूरकर-गुजराथीवाढत्या वयाची एक रेघही चेहे-यावर दिसू न देणारी हेमामालिनी, आई झाल्यानंतरही आपल्या मूळ सौंदर्याच्या सुबक ठेवणीत परतलेल्या करिना आणि ऐश्वर्या आणि सध्याची नंबर वन असलेली दीपिका यांनी आपल्या दीनचर्येत आहाराचं सूत्र पक्कं केलं आहे. त्या सूत्रानुसारच त्या खातात पितात आणि पाहणा-याला हेवा आणि कुतुहल वाटावं इतक्या सुंदर दिसतात.बॉलिवूडमधील काही ...

ठळक मुद्दे* हेमामालिनी संपूर्ण शाकाहरी आहार घेतात.* ऐश्वर्या राय जंकफूडला टाळतेच.* फिटनेससाठी दीपिका अतिशय जागरूक असते. व्यायाम आणि आहाराचे नियम कटाक्षानं पाळते.

-सारिका पूरकर-गुजराथीवाढत्या वयाची एक रेघही चेहे-यावर दिसू न देणारी हेमामालिनी, आई झाल्यानंतरही आपल्या मूळ सौंदर्याच्या सुबक ठेवणीत परतलेल्या करिना आणि ऐश्वर्या आणि सध्याची नंबर वन असलेली दीपिका यांनी आपल्या दीनचर्येत आहाराचं सूत्र पक्कं केलं आहे. त्या सूत्रानुसारच त्या खातात पितात आणि पाहणा-याला हेवा आणि कुतुहल वाटावं इतक्या सुंदर दिसतात.बॉलिवूडमधील काही अभिनेत्री कायमच सुंदर दिसतात. त्यांच्याकडे पाहून अनेकांना प्रश्न पडतो की या एवढ्या सुंदर कशा दिसत असतील. त्यासाठी त्या किती पैसे खर्च करत असतील. पण उत्तम फिगर आणि तजेलदार सौंदर्यासाठी त्यांना देश विदेशातले महागडे उपचार नाही तर रोजचा आहार मदत करतो.वाढत्या वयाची एक रेघही चेहे-यावर दिसू न देणारी हेमामालिनी,आई झाल्यानंतरही आपल्या मूळ सौंदर्याच्या सुबक ठेवणीत परतलेल्या करिना आणि ऐश्वर्या आणि सध्याची नंबर वन असलेली दीपिका यांनी आपल्या दीनचर्येत आहाराचं सूत्र पक्कं केलं आहे. त्या सूत्रानुसारच त्या खातात पितात आणि पाहणा-याला हेवा आणि कुतुहल वाटावं इतक्या सुंदर दिसतात.या खातात तरी काय?* हेमामालिनी :- हेमामालिनी संपूर्ण शाकाहरी आहार घेतात. दुपारच्या जेवणात त्या दोन रोटी, वाटीभर डाळ, अगदी थोडा रस्सम भात, दोन भाज्या असं परिपूर्ण जेवण घेतात. जोडीला रोज एक वाटी दही त्या आवर्जून खातात. तसेच रात्रीचं जेवण आठ वाजेच्या आतच घेण्याचा त्यांचा दंडक आहे. रात्रीच्या जेवणासाठी कमी तेलातील आणि कमी मसाल्याचे पदार्थ त्या खातात. याव्यतिरिक्त रोज दोन कप ग्रीन टी आणि भरपूर पाणी पितात. सोबतच आठवड्यातून दोन दिवस त्या उपवास करतात. उपवासाच्या दिवशी कोणतेही तेलकट आणि जड पदार्थ न खाता त्या सुकेमेवे, पनीर, ताजी फळं यांचं सेवन करतात.

 

* ऐश्वर्या राय :- विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिने देखील परिपूर्ण आहारालाच हाताशी धरलं आहे. वजन नियंत्रित राहावं याकरिता दिवसाची सुरूवात कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून तयार केलेल्या हेल्दी ड्रिंकनं करते. तसेच दिवसभर थोडा थोडा परंतु पौष्टिक तत्वांचा समावेश असणा-या आहारावर ती भर देते. नाश्यात ब्राऊन ब्रेड टोस्ट किंवा एक वाटीभरून ओट्स याचा समावेश असतो.दुपारच्या जेवणात उकडलेल्या भाज्या, एक वाटीभर डाळ आणि पोळीचा समावेश असतो. रात्रीच्या जेवणात ती सहसा ब्राऊन राइस आणि ग्रिल्ड फिश खाते. हे सर्व पदार्थ शरीरातील चरबी कमी करून पौष्टिक तत्वं प्रदान करणारे आहेत. जंकफूडला ती टाळतेच. दिवसातून आठ ग्लास पाणी, ताज्या फळांचे ज्युसेस पिणे हे नियमही ती पाळते.

* करिना कपूर :- बाळंतपणानंतर वर्षभराच्या आतच करिना कपूर जशी होती तशीच दिसायला लागलीय. त्यासाठी करिनानं सुरूवातीपासूनच आहाराला महत्त्वं दिलय. नाश्त्यात ती इडली, पराठा, मुसली, चीज, ब्रेड स्लाईसेस यापैकी एक घेते. सकाळच्या नाश्त्यात ब्राऊन ब्रेडपासून तयार केलेले सॅण्डविच ती घेते. त्यानंतर लंचला भरपूर हिरवे सॅलेड, डाळ-चपाती, सूप यांचा समावेश होतो. संध्याकाळच्या नाश्त्याला करिना सोया मिल्क किंवा प्रोटीन शेक घेते. रात्रीच्या जेवणात ती व्हेज सूप किंवा पोळी, भाकरी -भाजीला प्राधान्य देते. शिवाय रोज 6 ते 7 ग्लास कोमट पाणीही न चुकता पिते.

* दीपिका पदुकोण : फिटनेससाठी दीपिका अतिशय जागरूक असते. व्यायाम आणि आहाराचे नियम कटाक्षानं पाळते. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात मध- लिंबू घालून ती पाणी पिते. किंवा रात्रभर भिजत घातलेले मेथीदाणे सकाळी पाण्याबरोबर घेते. त्यानंतर नाश्ता म्हणून दोन एग व्हाइट, 2 बदाम व 1 कप दूध किंवा मग 2 एग व्हाईट / 2 इडल्या / 2 डोसे / उपमा घेते. जेवणाआधी बाऊलभरु न ताजी फळं ती खाते. त्यानंतर दुपारच्या जेवणात ग्रिल्ड फिश आणि उकडलेल्या भाज्या असतात. संध्याकाळचा नाश्ता म्हणून फिल्टर कॉफी आणि थोडे बदाम खाते. रात्रीच्या जेवणात भाजी-पोळी किंवा सलाड खाते.