शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताने जन्मलेला नास्ता : कॉर्न फ्लेक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 07:50 IST

Corn Flakes : बऱ्याच वेळाने पाहिले तर गहू किंचित आंबलेले होते. तरी पण केलॉग बंधूंना ते टाकून द्यावेसे वाटले नाहीत. काहीतरी प्रयोग करून पाहू म्हणून त्यांनी ते दाब देऊन सपाट लाटले, सुकवले आणि शेकवून घेतले.

- मेघना सामंत

गेल्या दोन रसयात्रांमधून मक्याचा वेध घेतल्यावर मक्याच्या पोह्यांवर लिहिणं ओघानेच आलं. या पोह्यांचा शोध लागला तो चक्क अपघातातून. जॉन हार्वे केलॉग हे अमेरिकेतले एक प्रतिष्ठित डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ होते. वृत्तीने कट्टर धार्मिक. मिशिगनमध्ये विल किथ केलॉग या आपल्या भावासोबत ते एक आरोग्य केंद्र चालवीत. एकदा या केंद्राच्या स्वयंपाकघरात शिजविलेले गहू तसेच राहून गेले.

बऱ्याच वेळाने पाहिले तर गहू किंचित आंबलेले होते. तरी पण केलॉग बंधूंना ते टाकून द्यावेसे वाटले नाहीत. काहीतरी प्रयोग करून पाहू म्हणून त्यांनी ते दाब देऊन सपाट लाटले, सुकवले आणि शेकवून घेतले. गव्हाचे मस्त कुरकुरीत पोहे तयार झाले. तेच दुधात घालून त्यांनी आपल्या सॅनिटेरियममधल्या रुग्णांना नाश्ता म्हणून वाढले. त्यांना ते फार आवडले. गहू वायाही गेले नाहीत आणि केलॉग यांचा सात्त्विक अन्नाचा आग्रहही पुरा झाला. 

तामसी अन्नामुळेच डोक्यात तामसी विचार येतात, अमेरिकन माणसांनी सकाळीसकाळी सात्त्विक आहार घेतला तर त्यांची वृत्ती शांत, सोज्ज्वळ बनेल यावर जॉन केलॉग यांचा ठाम विश्वास होता. गव्हाच्या पोह्यांवरून पुढे केलॉग बंधूद्वयाला मक्याच्या पोह्यांची कल्पना सुचली. प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी हे कॉर्न फ्लेक्स बाजारपेठेत विक्रीसाठी उतरविले. सर्वसामान्यांना आवडावेत  म्हणून त्यात साखर घालावी की नाही यावरून भावाभावांत मात्र कायमचं वितुष्ट आलं. असो.

१८९४ मध्ये घडलेल्या या अपघाताने अमेरिकेत अक्षरशः न्याहारीक्रांती घडून आली. मक्याच्या पोह्यांना कल्पनातीत प्रतिसाद लाभला. याअगोदर जड, मेदयुक्त न्याहारी खाण्याची प्रथा होती. भरपूर शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी ती योग्य. बैठं काम करणाऱ्या शहरी बाबूंसाठी हलकाफुलका नाश्ताच बरा. आजचा अमेरिकन माणूस कॉर्न फ्लेक्स वजा करून ब्रेकफास्टचा विचार करू शकत नाही.

त्याच्या वृत्तीमध्ये काही फरक पडलाय की नाही हा संशोधनाचा विषय ठरेल; पण खोका उघडला, वाडग्यात कुरकुरीत पोहे घेतले, त्यावर थंडगार दूध ओतलं की खायला सुरुवात, इतका सोपा तरीही पोटभरीचा नाश्ता दुसरा कुठला? अलीकडे भारतातही अनेक जण सकाळच्या आहारात कॉर्न फ्लेक्सना पसंती देतात ते सोय म्हणून; पण  फोडणीचे पोहे, उपमा, इडल्या, पराठे अशा दणदणीत आव्हानांसमोर मकापोह्यांचा जम म्हणावा तितका बसलेला नाही.

टॅग्स :foodअन्न