Zoya Afroz: मुंबईची झोया अफरोज ठरली 'मिस इंडिया इंटरनॅशनल २०२१'ची मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 03:01 PM2021-08-23T15:01:31+5:302021-08-23T15:02:45+5:30

मुंबईच्या झोया अफरोज हिनं मिस इंडिया इंटरनॅशनल २०२१ च्या हिरेजडीत लखलखत्या मुकूटावर आपलं नाव कोरलं आहे.

Zoya Afroz from Mumbai crowned as the Miss India International 2021 | Zoya Afroz: मुंबईची झोया अफरोज ठरली 'मिस इंडिया इंटरनॅशनल २०२१'ची मानकरी

Zoya Afroz: मुंबईची झोया अफरोज ठरली 'मिस इंडिया इंटरनॅशनल २०२१'ची मानकरी

googlenewsNext

Zoya Afroz: मुंबईच्या झोया अफरोज हिनं मिस इंडिया इंटरनॅशनल २०२१ च्या हिरेजडीत लखलखत्या मुकूटावर आपलं नाव कोरलं आहे. गुरुग्राम येथे २१ ऑगस्ट रोजी झालेल्या स्पर्धेत मुंबईच्या झोया अफरोजनं परिक्षकांचं मन जिंकलं. (Zoya Afroz, from Mumbai crowned as the Miss India International 2021)

मिस इंडिया इंटरनॅशनलची मानकरी ठरण्यासाठी झोयासह एकूण २४ स्पर्धकांचा अंतिम फेरीत समावेश झाला होता. यात देशातील विविध भागांमधून स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. यामध्ये झोया अफरोजसह अर्चना रवी, ऐश्वर्या दीक्षित, नयना विजय शर्मा, तानिया सिन्हा, सेजल रेनाके, हिमानी गायकवाड, मेघा शेट्टी, मेघा झुलके, दीक्शा नारंग, शिवानी टक, सांची गुरव, अस्मिता चक्रवर्ती, तनू श्री, श्वेता शिंदे, हन्ना तमलापाकुला, सुसंग शेर्पा, दिशा शामवानी, ईशा विद्या, अनन्या भक्ती, आरुषी सिंह, दिविजा गंभीर, शालिनी राणा, अनिता शर्मते यांचा समावेश होता. 

मुंबईची २६ वर्षीय झोया अफरोज मिस इंडिया इंटरनॅशनलची मानकरी ठरल्यानंतर ती आता मिस इंटरनॅशनल २०२१ मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. ती स्त्री शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य  या मुद्द्यांना प्रोत्साहन देते. महिलांना समाजात मूलभूत ज्ञान आणि संधीचा अधिकार मिळावा अशी तिची इच्छा आहे. अफरोजनं याआधी बऱ्याच चित्रपटात देखील काम केलं आहे. तसंच तिला नृत्याचीही आवड आहे. 

Web Title: Zoya Afroz from Mumbai crowned as the Miss India International 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.