स्वानंदी-आशिषच्या घरी लग्नाची धामधूम; मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 12:00 PM2023-12-24T12:00:00+5:302023-12-24T12:00:00+5:30

Swanandi tikekar: येत्या २५ डिसेंबरला स्वानंदी-आशिष लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे या जोडीच्या घरी लग्नाची गडबड सुरु झाली आहे.

Wedding pomp at Swanandi-Ashish's house Photos of the mehndi ceremony viral | स्वानंदी-आशिषच्या घरी लग्नाची धामधूम; मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर

स्वानंदी-आशिषच्या घरी लग्नाची धामधूम; मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर

मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईते वारे वाहत आहेत. एका पाठोपाठ एक लोकप्रिय जोड्या लग्नाच्या बेडीत अडकल्या जात आहेत. पियुष रानडे (piyush ranande)- सुरुची अडारकर (suruchi adarkar) , मुग्धा वैशंपायन (mugdha vaishampayan)- प्रथमेश लघाटे (prathamesh laghate) या जोड्यांनंतर आता गौतमी देशपांडे (gautami deshpande), स्वानंदी टिकेकर  (swanandi tikekar)या लोकप्रिय अभिनेत्रीसुद्धा लवकरच लग्नाच्या बंधनात अडकल्या जाणार आहेत. सध्या या दोघींच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींनी सुरुवात झाली आहे. नुकतेच गौतमीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर, आता स्वानंदी आणि आशिष कुलकर्णी यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

काही महिन्यांपूर्वीच स्वानंदीचा साखरपुडा पार पडला. या सोहळ्यातील अनेक निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता तिच्या घरी लग्नाच्या धावपळीला सुरुवात झाली आहे. येत्या २५ डिसेंबरला आशिष आणि स्वानंदी लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. यामध्येच स्वानंदीने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

या मेहंदी सोहळ्यासाठी स्वानंदी आणि आशिष यांनी लाल रंगाचे मॅचिंग असे कपडे परिधान केले होते. सोबतच या दोघांनी त्यांच्या पाळीव प्राण्यासोबत खास फोटोशूट केलं आहे. सोबतच तिने स्वानंदी आणि आशिष या दोघांच्या नावाचा #anandi हा हॅशटॅगही वापरला आहे.

दरम्यान, येत्या २५ डिसेंबरला स्वानंदी-आशिष लग्नगाठ बांधणार आहेत. स्वानंदी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई, दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, आशिषने 'इंडियन आयडॉल १२'मधून लोकप्रियता मिळवली आहे. आशिष कुलकर्णी हा गायक असून देशविदेशात तो त्याच्या गाण्याचे कार्यक्रम करतो. याशिवाय मराठी चित्रपटातील गाणीही त्याने गायलीत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत आशिषने स्वतःची ओळख बनवली आहे. 

Web Title: Wedding pomp at Swanandi-Ashish's house Photos of the mehndi ceremony viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.