'हीरामंडी' मध्ये 'या' पाकिस्तानी कलाकरांना करायचं होतं कास्ट, संजय लीला भन्साळींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 15:49 IST2024-05-01T15:48:55+5:302024-05-01T15:49:57+5:30

'हीरामंडी' येणार होता सिनेमा, भन्साळी 18 वर्षांपासून करत होते विचार

Sanjay Leela Bhansali revealed that he wanted to cast Pakistani actors in Heeramandi | 'हीरामंडी' मध्ये 'या' पाकिस्तानी कलाकरांना करायचं होतं कास्ट, संजय लीला भन्साळींचा खुलासा

'हीरामंडी' मध्ये 'या' पाकिस्तानी कलाकरांना करायचं होतं कास्ट, संजय लीला भन्साळींचा खुलासा

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित 'हीरामंडी'(Heeramandi) ही वेबसीरिज आजपासून प्रदर्शित झाली आहे. सहा अभिनेत्रींवर सीरिज आधारित आहे. लॉस एंजिल्समध्ये सीरिजच्या विशेष स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भन्साळींनी खुलासा करत सांगितले की पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खान यांचा आधी 'हीरामंडी'तील मुख्य भूमिकेसाठी विचार केला होता. इतकंच नाही गेल्या १८ वर्षांपासून त्यांच्या डोक्यात हीरामंडी हा प्रोजेक्ट होता.

कार्यक्रमात संजय लीला भन्साळी म्हणाले, "माझ्या डोक्यात अनेक भूमिका होत्या. गेल्या १८ वर्षांपासून हा प्रोजेक्ट मला करायचा होता. मी यासाठी आधी रेखा जी, राणी मुखर्जी आणि करीना कपूर यांचा विचार केला होता. तेव्हा मला हा सिनेमा बनवायचा होता. पाकिस्तानी कलाकार माहिरा खान, फवाद खान आणि इमरान अब्बास यांचीही नावं समोर होती, पण आता असलेल्या कलाकारांसोबत मी प्रोजेक्ट पूर्ण केला."

'हीरामंडी'सीरिजची घोषणा झाली तेव्हापासूनच याची चर्चा सुरु आहे. मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, संजीदा शेख, रिचा चड्डा, शर्मिन सहगल, शेखर सुमन, फरदीन खान, अध्ययन सुमन यांची सीरिजमध्ये मुख्य भूमिका आहे.

Web Title: Sanjay Leela Bhansali revealed that he wanted to cast Pakistani actors in Heeramandi