तुमची आवडती 'गायनॅक' पुन्हा ड्युटीवर हजर, सबा आझादच्या सीरिजचा दुसरा भाग येतोय; ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:42 IST2026-05-19T12:41:52+5:302026-05-19T12:42:43+5:30

काय आहे पार्ट २ ची कथा?

saba azad starrer who's your gynac series part 2 trailer released grabs attention | तुमची आवडती 'गायनॅक' पुन्हा ड्युटीवर हजर, सबा आझादच्या सीरिजचा दुसरा भाग येतोय; ट्रेलर रिलीज

तुमची आवडती 'गायनॅक' पुन्हा ड्युटीवर हजर, सबा आझादच्या सीरिजचा दुसरा भाग येतोय; ट्रेलर रिलीज

हलक्याफुलक्या विनोदामुळे, सहज जोडून घेता येणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे आणि आधुनिक स्त्रीजीवनाकडे प्रामाणिकपणे पाहणाऱ्या कथानकामुळे प्रेक्षकांची पसंती मिळवलेली ‘हू'ज युवर गायनॅक?’ या लोकप्रिय सीरिजचा दुसरा भाग येत आहे.  ॲमेझॉन एमएक्स प्लेयरने आज या बहुप्रतीक्षित दुसऱ्या सीझनचा ट्रेलर सादर केला. या नव्या सीझनमध्ये डॉ. विदुषी कोठारी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक वर्षांपासून ज्या आयुष्याचे स्वप्न ती पाहत होती, त्या नव्या टप्प्याकडे तिची वाटचाल सुरू होताना दिसणार आहे.

द व्हायरल फीव्हर (टीव्हीएफ) आणि गर्लियापा निर्मित या मालिकेत सबा आझाद पुन्हा प्रमुख भूमिकेत दिसणार असून, करिश्मा सिंह आणि आरॉन अर्जुन कौल यांच्यासह ही कथा जिथे थांबली होती, तिथूनच पुढे सरकणार आहे. हिमाली शाह दिग्दर्शित या नव्या सीझनमध्ये कुणाल ठाकूर, विभा छिब्बर आणि श्रुती सेठ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 22 मे रोजी प्रदर्शित होणारा ‘हू'ज युवर गायनॅक?’ सीझन 2 मधून रुग्णांसाठी, मित्रांसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःसाठी उभे राहण्याची भावनिक आणि प्रेरणादायी कथा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे.

या ट्रेलरमधून डॉ. विदुषी कोठारी (सबा आझाद) हिच्या आयुष्यातील नव्या टप्प्याची भावनिक आणि मनाला भिडणारी झलक पाहायला मिळते. पहिल्या सीझनमधील घटनांनंतर तीन महिन्यांनी विदुषीने एकेकाळी अशक्य वाटणारे पाऊल उचलले आहे. स्वतःचे क्लिनिक सुरू करण्याचे अनेक दिवसांपासून जपलेले स्वप्न तिने अखेर पूर्ण केले आहे. मात्र स्वतःचे क्लिनिक चालवणे ही काही सोपी गोष्ट नाही. दैनंदिन कामकाज सांभाळणे, भाड्याची जुळवाजुळव करणे आणि स्वतःच्या मनातील असुरक्षित भावनांशी शांतपणे सामना करणे अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये विदुषी अडकलेली दिसते. अशा वेळी तिचे रुग्ण आणि तिचे मित्र स्वरा (करिश्मा सिंह) आणि मेहर (आरॉन अर्जुन कौल) तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. पहिल्या सीझनमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या त्याच आपुलकी, प्रेम आणि जिद्दीने विदुषी पुन्हा एकदा सर्वांसाठी उभी राहताना दिसणार आहे.

ॲमेझॉन एमएक्स प्लेयरचे कंटेंट प्रमुख अमोघ दुसाद म्हणाले, “हू'ज युवर गायनॅकच्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांशी सहज नाते जोडले कारण ती कथा प्रामाणिक, आपुलकीशी आणि वास्तवाशी जवळीक साधणारी होती. नव्या सीझनमध्ये आम्ही डॉ. विदुषीच्या पुढील प्रवासाची कथा सांगत आहोत. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील दगदग सांभाळताना ती स्वतःमधील नवे पैलूही ओळखू लागते. ॲमेझॉन एमएक्स प्लेयरमध्ये आम्ही वेगळ्या कथानकांना पाठबळ देण्यावर भर देतो आणि मनोरंजनासोबतच प्रेक्षकांशी भावनिक नाते निर्माण करणाऱ्या कथा सादर करण्यासाठी कटिबद्ध आहोत. हा सीझन नेमके तेच करतो. प्रेक्षकांशी इतक्या नैसर्गिकपणे जोडली गेलेली ही कथा पुन्हा एकदा घेऊन येताना आम्हाला आनंद होत आहे आणि डॉ. विदुषीला पुन्हा एकदा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

आपल्या भूमिकेबद्दल सबा आझाद म्हणाली, “दुसऱ्या सीझनमध्ये पुन्हा एकदा विदुषीच्या भूमिकेत परतणे म्हणजे घरी परतल्यासारखे वाटले. फक्त यावेळी ते घर म्हणजे तिचे स्वतःचे क्लिनिक आहे! या सीझनमधील मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे स्वतःविषयी वाटणाऱ्या शंका आणि आपल्या आजुबाजूच्या लोकांना सगळे काही आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते, अशी सतत मनात राहणारी भावना अत्यंत वास्तव पद्धतीने दाखवण्यात आली आहे. विदुषी अजूनही तितकीच अपूर्ण आहे, अजूनही चुका करते, पण त्याच वेळी ती बदलतही आहे. हा बदल अनेकांना स्वतःच्या आयुष्याशी जोडून घेता येईल, असे मला वाटते. प्रेक्षक तिच्यासोबत हसतील, तिच्यासाठी आनंद व्यक्त करतील आणि तिच्या प्रवासात स्वतःचाही काही भाग शोधतील, अशी मला आशा आहे.”

दिग्दर्शिका हिमाली शाह म्हणाली, “दुसऱ्या सीझनमुळे आम्हाला विदुषीसमोर येणाऱ्या वैद्यकीय प्रकरणांबरोबरच प्रत्येक पात्राच्या भावविश्वात अधिक खोलवर जाण्याची संधी मिळाली. या सीझनमधील प्रत्येक पात्राचा प्रवास अधिक जवळचा आणि अनेक स्तर उलगडणारा वाटतो, कारण प्रत्येकजण आयुष्यातील बदलांना सामोरे जात आहे. या सीझनमध्ये प्रत्येक पात्राला स्वतःचा क्षण मिळतो आणि एकत्रित कलाकारांनी ही कथा ज्या प्रकारे साकारली आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. ‘हू'ज युवर गायनॅक?’ ही मालिका मनापासून तयार करण्यात आली आहे आणि दुसरा सीझनही त्याला अपवाद नाही. उलट यावेळी आम्ही झोकून देऊन काम केले आहे. ॲमेझॉन एमएक्स प्लेयरसोबतची आमची भागीदारी पुढे सुरू ठेवताना आम्हाला आनंद होत आहे आणि आमच्या मनाजवळ असलेली ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणताना आम्ही उत्सुक आहोत.”

‘हू'ज युवर गायनॅक?’ सीझन 2 हा 22 मेपासून केवळ ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर मोफत पाहता येणार आहे. ही मालिका मोबाईल उपकरणे, कनेक्टेड टीव्ही, ॲमेझॉन शॉपिंग ॲप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, जिओटीव्ही आणि एअरटेल एक्सस्ट्रीम यांसह विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.

Web Title : आपकी पसंदीदा 'गायनैक' वापस! 'हू इज योर गायनैक?' सीजन 2

Web Summary : सबा आज़ाद 'हू इज़ योर गायनैक?' सीजन 2 में डॉ. विदुषी कोठारी के रूप में वापसी कर रही हैं, जिसका प्रीमियर 22 मई को अमेज़ॅन एमएक्स प्लेयर पर होगा। यह श्रृंखला विदुषी के अपने क्लिनिक खोलने और दोस्तों और रोगियों के समर्थन से व्यक्तिगत और व्यावसायिक चुनौतियों का सामना करने की यात्रा का पता लगाती है।

Web Title : Your favorite 'Gynaec' is back! 'Who's Your Gynaec?' Season 2

Web Summary : Saba Azad returns as Dr. Vidushi Kothari in 'Who's Your Gynaec?' Season 2, premiering May 22nd on Amazon MX Player. The series explores Vidushi's journey of opening her own clinic and navigating personal and professional challenges with support from friends and patients.