काय? भूमी पेडणेकरने घेतलेला मोठा ब्रेक; खुलासा करत म्हणाली, "मी पूर्णपणे कोसळले होते कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 16:56 IST2026-01-22T16:56:09+5:302026-01-22T16:56:46+5:30
ब्रेक घेतल्याचं कोणालाच सांगितलं नाही कारण...

काय? भूमी पेडणेकरने घेतलेला मोठा ब्रेक; खुलासा करत म्हणाली, "मी पूर्णपणे कोसळले होते कारण..."
अभिनेत्री भूमी पेडणेकर आगामी 'दलदल' सीरिजमुळे चर्चेत आहे. 'द रॉयल्स' सीरिजच्या यशानंतर आता तिची ही क्राइम थ्रिलर सीरिज येत आहे. यामध्ये भूमी पोलिसअधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. दरम्यान 'द रॉयल्स' नंतर भूमीने नऊ महिन्यांचा ब्रेक घेतला होता. ती अक्षरश: नैराश्यातच गेली होती. तिच्या ट्रोलिंगचाही परिणाम झाला होता. याचं कारण तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत भूमी पेडणेकर म्हणाली, "मला खूप ट्रोलिंग करण्यात येत होतं. या सगळ्यात मी माझी क्रिएटिव्हीटीही गमावून बसले होते. २०२५ वर्षाने मला आयुष्यात काही मोठे निर्णय घेण्यासाठी प्रेरित केलं. त्यातच एक म्हणजे ब्रेक घेण्याचा निर्णय. मी ब्रेक घेतेय असं मी कधी जाहीरपणे सांगितलं नाही कारण मला याचा इश्यू बनवायचा नव्हता."
ती पुढे म्हणाली, "ट्रोलिंगमुळे मी मनातून कोसळले होते. एक अभिनेत्री म्हणून, माणूस म्हणून, भूमी म्हणून मी स्वत:ची ओळखच गमावली होती. म्हणूनच मला थोडं मागे जायचं होतं. मी ब्रेक घेतला. जूनपासून मी एकाही सेटवर दिसले नव्हते. अनेकदा जेव्हा एखादा कलाकार असा निर्णय घेतो तेव्हा याकडे निगेटिव्ह दृष्टीने पाहिलं जातं. पण मी हे स्वत:च्या इच्छेने केलं होतं. हा माझ्यासाठी सर्वात चांगला निर्णय राहिला. या ब्रेकमध्ये मी सिनेमे पाहिले, पुस्तकं वाचली, हार्वर्ड युनिव्हर्सिटीत एक कोर्स केला आणि आयुष्यात आणखी अनुभव घेण्याचा प्रयत्न केला."
भूमीची सीरिज 'दलदल' २० जानेवारी रोजी प्राइमवर रिलीज होत आहे. तिच्यासोबत यामध्ये आदित्य रावल आणि समारा तिजोरीही आहेत. याचं दिग्दर्शन अमृत राज गुप्ता यांनी केलं आहे.