Next

Sneha Wagh & Avishkar Darvekar In Bigg Boss House | घटस्फोटानंतर पुन्हा एकाच घरात स्नेहा-अविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 12:13 PM2021-09-20T12:13:28+5:302021-09-20T12:13:52+5:30

ही अभिनेत्री आहे हिंदी टेलिविजन क्षेत्रातील नावाजलेला चेहरा स्नेहा वाघ. स्नेहाने धुमधडाक्यात बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली खरी पण स्नेहाचा हा आनंद फार काळ टिकला नाही.अभिनेता आविष्कार दारव्हेकरची एन्ट्री होताच स्नेहा अस्वस्थ झालेली पहायला मिळाली. तिच्या डोळ्यातली नाराजी घरातील सदस्यांना स्पष्ट जाणवली. आणि म्हणूनच अभिनेता विशाल निकम याने तिची विचारपूस केली. आविष्कारला तू आधीपासून ओळखते का विशालच्या प्रश्नावर स्नेहाने हो तर म्हटले पण अधिक उत्तर देणे टाळले. त्यामुळं स्नेहा -आविष्कारमध्ये काय कनेक्शन आहे...हे नेमकं काय प्रकरण आहे. असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर कधीकाळी पती- पत्नी होते. या दोघांचा घटस्फोट झाला आहे.