थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 11:18 IST2026-05-11T11:17:31+5:302026-05-11T11:18:38+5:30
शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर त्रिशा जेव्हा स्टेडियमच्या बाहेर पडली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हजारो चाहत्यांनी आणि पत्रकारांनी तिला अक्षरशः घेरले.

थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून थलापती विजय यांनी १० मे २०२६ रोजी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भव्य शपथ घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याला दाक्षिणात्य सुंदरी तृषा कृष्णनने आपली आई उमा कृष्णन यांच्यासह विशेष उपस्थिती लावली होती. विजयच्या कुटुंबातील सदस्यांसोबत बसून तृषाने हा संपूर्ण सोहळा जवळून पाहिला. एका सुपरस्टारचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास पाहताना तृषाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान होते.
स्टेडियमबाहेर चाहत्यांनी घातला घेराव
शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर तृषा जेव्हा स्टेडियमच्या बाहेर पडली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हजारो चाहत्यांनी आणि पत्रकारांनी तिला अक्षरशः घेरले. ऐतिहासिक विजयावर आणि शपथविधीवर त्रिशाची पहिली प्रतिक्रिया काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्वांची मोठी धडपड सुरू होती. अचानक आलेल्या या गर्दीमुळे स्टेडियमबाहेर काही काळ गोंधळ उडाला होता.
#WATCH | Chennai, Tamil Nadu: Actor Trisha Krishnan leaves from the Jawaharlal Nehru Stadium in Chennai after attending the oath-taking ceremony of TVK Chief Vijay as the Chief Minister of Tamil Nadu. pic.twitter.com/p9ah5mn0Om
— ANI (@ANI) May 10, 2026
प्रचंड गर्दीतही तृषाने राखला संयम
पत्रकारांकडून होणारी प्रश्नांची सरबत्ती आणि चाहत्यांकडून होणारी धक्का-बुक्की अशा परिस्थितीतही तृषाने कमालीचा संयम राखला. कोणत्याही प्रकारचा संताप व्यक्त न करता ती अत्यंत धैर्याने आणि शांतपणे गर्दीतून मार्ग काढताना दिसली. या गोंधळातही तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम होते, तिच्या या वागण्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
तृषाच्या सौंदर्याची अन् लूकची चर्चा
या खास प्रसंगी तृषाच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साडीमधील तिचा शालीन लूक आणि चेहऱ्यावरची चमक पाहून चाहते फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असून, "विजयचा मुख्यमंत्री बनण्याचा यशाचा खरा आनंद तृषाच्या चेहऱ्यावर दिसत आहे," अशा चर्चांना उधाण आले आहे. विजय आणि तृषाच्या मैत्रीचे बंध या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
चित्रपट आणि आगामी प्रोजेक्ट्स
तृषाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्यासोबत 'करुप्पू' या चित्रपटात झळकणार आहे. आरजे बालाजी दिग्दर्शित हा चित्रपट १४ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. दुसरीकडे, मुख्यमंत्री बनलेल्या विजयचा शेवटचा चित्रपट 'जननायकन' सेन्सॉर बोर्डाच्या वादामुळे अडकला असून नुकताच त्याच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.