Nava Gadi Nava Rajya : कसं एवढं येडं बनवता राव? ‘नवा गडी, नवं राज्य’ मालिका पाहून संतापले प्रेक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 10:38 AM2022-09-15T10:38:09+5:302022-09-15T10:38:45+5:30

Nava Gadi Nava Rajya : ‘नवा गडी, नवं राज्य’ या मालिकेला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. पण मालिकेचं कथानक पुढे सरकत असतानाच, आता ही मालिका प्रेक्षकांच्या निशाण्यावर आली आहे.

zee marathi new serial Nava Gadi Nava Rajya new promo trolled | Nava Gadi Nava Rajya : कसं एवढं येडं बनवता राव? ‘नवा गडी, नवं राज्य’ मालिका पाहून संतापले प्रेक्षक

Nava Gadi Nava Rajya : कसं एवढं येडं बनवता राव? ‘नवा गडी, नवं राज्य’ मालिका पाहून संतापले प्रेक्षक

googlenewsNext

झी मराठी (Zee Marathi ) या वाहिनीवर गेल्या काही दिवसांत एकापेक्षा एक वेगवेगळ्या विषयावरच्या मालिका सुरू झाल्यात. प्रेक्षकांना रिझवून ठेवण्यासाठीचा वाहिनीचा हा प्रयत्न कौतुकास्पद असला तरी प्रत्यक्षात मालिका पाहून प्रेक्षक निराश आहेत. झी मराठीवर नुकतीच सुरू झालेली ‘नवा गडी, नवं राज्य’ (Nava Gadi Nava Rajya ) ही मालिका सध्या जबरदस्त ट्रोल होतेय. अगदी काही काय दाखवता राव, आम्ही येडे आहोत काय? असा उद्विग्न सवाल प्रेक्षक विचारत आहेत. आता असं काय झालं? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल...

रात्री 9 च्या ठोक्याला सुरू होणाऱ्या या मालिकेला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. पण मालिकेचं कथानक पुढे सरकत असतानाच, आता ही मालिका प्रेक्षकांच्या निशाण्यावर आली आहे.

‘नवा गडी, नवं राज्य’ या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते रमाची भूमिका साकारत आहेत. रमाचा मृत्यू झाला आहे. पण तरिही तिचं ‘भूत’ घरात नांदत असतं. तिचा नवरा राघव दुसरं लग्न करून आनंदीला घरात आणतो. पण रमा आनंदीच्या संसारात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करते आणि रमा फक्त आनंदीलाच दिसते. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला. यात कॉलनीतले लाईट गेलेले असताना सगळे आवारात जमलेले दिसत आहेत. मुलं थोडी घाबरली आहेत. अशात भूत आलं तर असं चिंगी म्हणते. यावर रामरक्षा म्हण, असं आनंदी तिला सुचवते. शेजारी रमा असतेच. अचानक रामरक्षा सुरू झाल्यावर तिला अस्वस्थ वाटायला लागतं आणि हे पाहून आनंदीला आश्चर्य वाटतं. आनंदीचा हा उपाय रमाला पळवून लावेल का? याचं उत्तर येणाऱ्या भागांत आपल्याला मिळेलच. पण तूर्तास हा प्रोमो पाहून प्रेक्षक बिथरले आहेत. अरे काही काय दाखवता? असं म्हणत प्रेक्षकांनी मालिकेला ट्रोल केलं आहे.

 गणपतीच्या पाया पडली, पुजेला बसली तेव्हा काही झालं नाही आणि मंत्र बोलल्यावर काय झालं? कसं एवढं येडं बनवता राव? अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरने दिली. प्रेक्षक येडे वाटतात यांना, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

Web Title: zee marathi new serial Nava Gadi Nava Rajya new promo trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.