युविका म्हणते, प्रिन्सच्या भावना खर्‍याच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:36 IST2016-01-16T01:14:33+5:302016-02-06T11:36:57+5:30

​बिग बॉस हा शो नेहमीच वेगवेगळ्य़ा कारणांनी चर्चेत राहतो. यात आणखी एक नाटकीय वळण आले आहे. बिग बॉसच्या रिअँलिटी शोमधून ...

Yuvvica says, Prince's feeling really! | युविका म्हणते, प्रिन्सच्या भावना खर्‍याच!

युविका म्हणते, प्रिन्सच्या भावना खर्‍याच!

िग बॉस हा शो नेहमीच वेगवेगळ्य़ा कारणांनी चर्चेत राहतो. यात आणखी एक नाटकीय वळण आले आहे. बिग बॉसच्या रिअँलिटी शोमधून युविकाला एलिमिनेट करण्यात आले आहे. त्यानंतर तिने वृत्तसंस्थेशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. मला खात्री आहे की प्रिन्स जेन्यून आहे. खरं तर त्यानेही हे अनेक वेळा सांगितले आहे. जेव्हा मी एलिमिनेट झाले. त्यावेळी बिग बॉसचे घर सोडताना प्रिन्स खूप नाराज दिसत होता. तो मला धीर देण्यासाठीही पुढे आला नाही. फक्त माझ्याकडे पाहत राहिला. तो सहज माझ्याकडे येऊन मला भेटू शकला असता, मात्र त्याने तसे केले नाही. त्यामुळे तो प्रसिद्धीसाठी स्टंट करत नसून, त्याच्या भावना प्रामाणिक आहेत, असे युविकाने म्हटले आहे. रिअँलिटी शोमधला स्टार असलेल्या प्रिन्स युविकाचा क्लोज फ्रेंड आहे. बिग बॉसचा तो विजेता होण्याची संधी आहे. तशी मी किश्‍वर, सुयश, प्रिन्स आणि ऋषभची मैत्रिण आहे. यापैकी किश्‍वर आणि प्रिन्स या दोघांमध्येच अधिक चुरस होईल. मला हे दोघेच आता स्ट्राँग वाटतात, मला त्यांच्यापैकीच कुणीतरी एकच विजेता ठरेल, असे वाटते असेही तिने सांगितले आहे.

Web Title: Yuvvica says, Prince's feeling really!