बिग बॉसच्या घरातील साध्याभोळ्या ज्योती कुमारीचा ‘हा’ लूक बघून तुम्ही चकित व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 15:34 IST2017-12-21T10:04:55+5:302017-12-21T15:34:55+5:30

बिग बॉसच्या घरात एकदा गेल्यानंतर कोणीही सेलिब्रिटी बनतो यात शंका नाही. गेल्या सीजनमध्ये बिग बॉसच्या शोमध्ये सहभागी झालेल्या मोनालिसा ...

You will be amazed by the look of the 'Hai' look of Big Boss house Jyoti Kumari! | बिग बॉसच्या घरातील साध्याभोळ्या ज्योती कुमारीचा ‘हा’ लूक बघून तुम्ही चकित व्हाल!

बिग बॉसच्या घरातील साध्याभोळ्या ज्योती कुमारीचा ‘हा’ लूक बघून तुम्ही चकित व्हाल!

ग बॉसच्या घरात एकदा गेल्यानंतर कोणीही सेलिब्रिटी बनतो यात शंका नाही. गेल्या सीजनमध्ये बिग बॉसच्या शोमध्ये सहभागी झालेल्या मोनालिसा आणि लोकेश कुमारीचे आयुष्य पूर्णत: बदलले, हे आपण बघितले आहे. आता या सीजनमध्ये सहभागी झालेल्या ज्योती कुमारी हिच्याही आयुष्यात बरेचसे सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येत आहे. होय, बिहारमधील एका छोट्याशा गावातून आलेल्या ज्योतीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्याने ती सध्या तिच्या भागात स्टार बनली आहे. ज्योती घरातील इतर सदस्यांच्या तुलनेत सर्वात लहान होती. सुरुवातीला आपल्या साध्याभोळ्या लाइफस्टाइलमुळे तिला घरात इतरांसोबत अ‍ॅडजेस्ट करायला वेळ लागला. मात्र जेव्हा घरात वादविवाद सुरू झाले तेव्हा तिनेही स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान ज्योती विकासची बहीण बनल्याने दोघांचे नाते चर्चेचा विषय ठरले. 




खरं तर जेव्हा ज्योतीने बिग बॉसच्या शोमध्ये एंट्री केली होती, तेव्हा ती खूपच सिम्पल मुलगी होती. मात्र बिग बॉसच्या घराबाहेर पडताच तिच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाला आहे. तिची ड्रेसिंग स्टाइल कमालीची आहे. बिग बॉसच्या घरात ज्याप्रमाणे ज्योती दिसायची ती ज्योती आता अजिबातच राहिली नाही, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. तिने मेकओव्हर केला असून, तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत येत आहे. 



ज्योतीने सलमान खानसमोर या शोमध्ये एंट्री करताना म्हटले होते की, तिला अभिनेत्री बनायचे आहे. अभिनयात मला खूप रस आहे. यावर सलमाननेही तिला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यादृष्टीनेच आता ज्योतीने पाऊल टाकले असून, अभिनय क्षेत्रात येण्याची तिची धडपड सुरू झाली आहे. दरम्यान, ज्योती तिच्या या नव्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. खरं तर बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतरच ज्योतीने स्वत:च्या लूकवर भर दिला. नव्या लूकमधील काही फोटोज् तिने तिच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केले आहेत. 

Web Title: You will be amazed by the look of the 'Hai' look of Big Boss house Jyoti Kumari!