​‘रिश्ता लिखेंगे हम नया’ मालिकेतील दिया आणि रतनचा नवा लूक तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 10:25 IST2018-02-10T04:55:09+5:302018-02-10T10:25:09+5:30

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील रिश्ता लिखेंगे हम नया ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असले तरी या मालिकेचे लोकांकडून ...

Will you write a relationship in the series 'New' and see Ratan's new look? | ​‘रिश्ता लिखेंगे हम नया’ मालिकेतील दिया आणि रतनचा नवा लूक तुम्ही पाहिला का?

​‘रिश्ता लिखेंगे हम नया’ मालिकेतील दिया आणि रतनचा नवा लूक तुम्ही पाहिला का?

नी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील रिश्ता लिखेंगे हम नया ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असले तरी या मालिकेचे लोकांकडून खूप कौतुक होत आहे. दिया आणि रतनच्या भूमिकेत असलेले तेजस्वी प्रकाश आणि रोहित सुचंती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. दिया आणि रतनच्या विवाहाबरोबरच कथेस आता एक वेगळे वळण मिळणार आहे. या मालिकेत आता एक नवी प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेची कथा ही एका राजस्थानी कुटुंबावर आधारित आहे. त्यामुळे या मालिकेत आपल्याला राजस्थानी परंपरा पाहायला मिळतात. आता या मालिकेत दिया आणि रतन एका नव्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ते दोघेही व्हिक्टोरियन लुकमध्ये दिसणार आहेत.
‘रिश्ता लिखेंगे हम नया’ या मालिकेच्या आगामी भागांमध्ये कुटुंबाच्या परंपरेनुसार दिया आणि रतनचे व्हिक्टोरियन थीमवर आधारित पोर्ट्रेट बनवले जाणार आहेत. रतन यासाठी खूप उत्सुक आहे तर दियाला या पोर्ट्रेट बनवायला काहीशी भीती वाटत आहे. कारण हे नवे रूप अंगिकारणे तिच्यासाठी अवघड आहे आणि त्यासाठी तिला विशेष तयारी करावी लागणार आहे. पण फोटोशूटमध्ये काहीतरी गोंधळ होणार आहे आणि त्यांचे एक अनोखे आणि विचित्र रॉयल पोर्ट्रेट बनवले जाणार आहे. यात दिया व्हिक्टोरियन गाऊनमध्ये नाही, तर बाथरोबमध्ये दिसणार आहे. याविषयी तेजस्वी सांगते, हे आम्ही चित्रित केलेले सर्वात गंमतीशीर दृश्य होते. ते पडद्यावर गंभीर दिसेल, पण पडद्यामागे या दृश्याचे चित्रीकरण करताना आम्ही खूप मजा मस्ती केली. हे दृश्य प्रेक्षकांना देखील खूप आवडेल अशी मला खात्री आहे. या दृश्याविषयी रोहित सांगतो, “रॉयल पोर्ट्रेटचे दृश्य चित्रित करताना आम्ही खूप धमाल केली. मी क्रिएटिव्ह टीमसोबत बसून आवश्यक तो अचूक लुक मिळवण्यासाठी माझी मते सांगितली. त्यामुळे हा एक एकत्रित केलेला प्रयास होता आणि त्याचा परिणाम चांगला मिळाला असे मला वाटते.”


Also Read : ​रिश्ता लिखेंगे हम नया मध्ये रोहित सुचंतीची झाली अशी फजिती

Web Title: Will you write a relationship in the series 'New' and see Ratan's new look?