का झाली सनी लिओनी लोपामुद्रावर फिदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2016 01:10 PM2016-11-22T13:10:02+5:302016-11-22T13:10:02+5:30

बिग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यात शोचा होस्ट आणि अभिनेता दबंग सलमान खानने घरातील सदस्यांची शाळाच घेतली होती. घरातले सगळे ...

Why did Sunny Leone hit the Lopampura? | का झाली सनी लिओनी लोपामुद्रावर फिदा?

का झाली सनी लिओनी लोपामुद्रावर फिदा?

googlenewsNext
ग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यात शोचा होस्ट आणि अभिनेता दबंग सलमान खानने घरातील सदस्यांची शाळाच घेतली होती. घरातले सगळे स्पर्धक सुस्त असून रसिकांचं मनोरंजनच करत नसल्याची खंत दबंग खानने बोलून दाखवली होती. बिग बॉस सीझन दहामधील सगळे सदस्य फक्त झोपा काढण्यासाठी आले आहेत अशा शब्दांत सलमाननं सुनावले होते. अशातच शोमध्ये मनोरंजनाचा एक्स फॅक्टर ऍड करण्यासाठी बिग बॉसच्या घरात अभिनेत्री आणि पॉर्नस्टार हॉट एंड सेक्सी सनी लिओनीची एंट्री झाली. सनीने घरात एंट्री मारताच घरातील सदस्यांना एक टास्क दिला. क्षणात व्हायरल होईल असा व्हिडीओ घरातल्या सदस्यांनी बनवावा असा व्हायरल व्हिडीओ फिव्हर नावाचा टास्क सनीने दिला.यासाठी दोन टीम बनवण्यात आल्या. एक टीम होती बानीची तर दुसरी टीम होती लोपामुद्राची. या अनोख्या टास्कची जज खुद्द सनी लिओनी होती. या टास्कमध्ये लोपामुद्रा राऊतने केलेला सेक्सी पोलडान्स अनेकांसाठी थक्क करणारा ठरला. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये लोपामुद्राने सनीच्या दो टकिला शॉट या गाण्यावर पोल डान्स करण्यास सुरुवात केली. आपल्या सेक्सी आणि मादक अदांनी लोपामुद्रा घरातील सहकारी रोहन मेहरा आणि मन्नू पंजाबी यांना घायाळ केले. दोघेही तितक्याच उत्साहाने लोपामुद्राच्या या ना-ना सेक्सी मुद्रांचा आनंद घेताना पाहायला मिळाले. लोपामुद्राचा हा अनोखा अंदाज पाहून कुणाचीही झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. लोपामुद्राच्या अदांवर रोहन आणि मन्नुच फिदा झाले नव्हते तर खुद्द सनी लिओनीही फिदा झाली. लोपामुद्राच्या या अदाही रसिकांनाही तितक्याच भावल्या असतील. मात्र तिच्या या अदा पाहून रसिक पाच वर्षे मागेही गेले असतील. कारण पाच वर्षांपूर्वी बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये खुद्द त्यावेळी पॉर्नस्टार अशी ओळख असलेल्या सनी लिओनीने बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून असताना पोल डान्स केला होता. त्यावेळी सनीच्या मादक अदा सा-यांनीच पाहिल्या होत्या. या शोनंतरच सनीसाठी बॉलीवुडचे दरवाजे खुले झाले होते. त्यामुळे आता या हॉट एंड सेक्सी मुद्रा आणि अदांनी रसिकांना घायाळ करण्यासोबतच लोपामुद्राने बॉलीवुडचे दरवाजे तर ठोठावले नाहीत ना ? हा हॉट पोल डान्स म्हणजे बॉलीवुडमध्ये एंट्री करण्याच्या दिशेने लोपामुद्राचे हे पहिले पाऊल म्हटल्यास वावगे ठरु नये.   

Web Title: Why did Sunny Leone hit the Lopampura?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.