बोल्ड लुकसाठी या अभिनेत्रीला का घ्यावा लागला कॉस्मेटीक सर्जरीचा आधार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 17:27 IST2016-11-18T17:26:06+5:302016-11-18T17:27:26+5:30

सोशल मिडियावर मौनी रॉयवर चर्चेचा विषय ठरतेय.मौनीने तिचे काही फोटो सोशल मिडियावर टाकताच तिच्यावर अनेक प्रश्नाचा भडिमार करण्यात येतोय ...

Why did this actress take a bold look for cosmetic surgery? | बोल्ड लुकसाठी या अभिनेत्रीला का घ्यावा लागला कॉस्मेटीक सर्जरीचा आधार?

बोल्ड लुकसाठी या अभिनेत्रीला का घ्यावा लागला कॉस्मेटीक सर्जरीचा आधार?

शल मिडियावर मौनी रॉयवर चर्चेचा विषय ठरतेय.मौनीने तिचे काही फोटो सोशल मिडियावर टाकताच तिच्यावर अनेक प्रश्नाचा भडिमार करण्यात येतोय कारण तिच्या या फोटोंमध्ये तिच्या चेह-यात कमालीचा फरक जाणवतोय. कॉस्मेटिक सर्जरी केल्यामुळे तिच्या चेह-यात हा फरक जाणवत असल्याते बोलले जातेय. तिचे बारिक असलेले ओठांचा शेप अचानक ब्रॉड दिसतोय.तिच्या जुने फोटो आणि आत्ताचे नविन फोटोंमध्ये जमीन आसमानचा फरक जाणवतोय. नविन लुक मिळवण्यासाठी बी-टाऊनच्या अभिनेत्रींनी कॉस्मेटीक सर्जरी केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. कॉस्मेटीक सर्जरी केल्यामुळे या अभिनेत्री अधिक बोल्ड दिसू लागतात. त्याचप्रमाणे प्रसिध्दी झोतात असणारी मौनी रॉयने बोल्ड लुक मिळवण्यासाठी कॉस्मेटीक सर्जरी केली असल्याचे बोलले जात आहे. 'नागिन','नागिन 2' हे दोन्ही मालिका सुपरिहट ठरल्यामुळे मौनीचा चाहत्यांच्या संख्याही वाढली आहे. छोटा पडदा गाजवल्यानंतर मौनीने  'तुम बिन 2' सिनेमातही नृत्याची झलक दाखवली आहे. मौनी रॉयचे वाढता करिअर ग्राफ पाहता तिने स्वतःला अधिक बोल्ड दिसण्यासाठी कॉस्मेटीक सर्जरीचा आधार घेतल्याचे कळतंय. 

Web Title: Why did this actress take a bold look for cosmetic surgery?