"कितीतरी वर्ष झाली आपल्या मैत्रीला पण...", पॅडीच्या वाढदिवशी विशाखा सुभेदार यांची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:05 IST2026-05-11T13:05:08+5:302026-05-11T13:05:29+5:30
पॅडीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या लाडक्या मित्रासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

"कितीतरी वर्ष झाली आपल्या मैत्रीला पण...", पॅडीच्या वाढदिवशी विशाखा सुभेदार यांची खास पोस्ट
आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा अभिनेता पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडीचा आज वाढदिवस आहे. पॅडीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या लाडक्या मित्रासाठी खास पोस्ट लिहिली आहे. विशाखा यांनी पंढरीनाथ कांबळेला सोशल मीडियावरुन वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये विशाखा यांनी म्हटलं आहे की "वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा पंढरीनाथ कांबळे(paddy). कितीतरी वर्ष झाली आपल्या सोबतीला येड्यांची जत्रा पासून ते आजपर्यंत...आणि एकत्र काम करता करता कितीतरी प्रवास घडले. २०११ ते २०२६. 'येड्यांची जत्रा'च्या वेळी किती गप्पा टाकल्या आपण, आपले विषय आपलं शेअरिंग अजुनही संपत नाहीये. अजूनही तुला मला, आणि मला तुला काहीतरी सांगायचंच आहे. तुझ्याबरोबर केलेले सगळे प्रवास...मज्जेशीर. मी १०० टक्के सांगू शकते, तुझ्यासारखा प्रवास सवंगडी होणे नाही. दुसऱ्याच्या चेहेऱ्यावर सातत्याने हसू फुलवणे तुला जमते. खूप आनंदात राहा, सुखात राहा..जे जे तुला हवं ते ते मिळो...".
पॅडी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 'कॉमेडीची बुलेट ट्रेन', 'गंगुबाई नॉनमॅट्रीक', 'येड्यांची जत्रा', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' अशा कॉमेडी शोमधून त्याने प्रेक्षकांना खळखळवून हसवलं आहे. काही मालिका आणि सिनेमांमध्येही तो दिसला. 'ही पोरगी कुणाची', 'एकदा येऊन तर बघा', 'खबरदार', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे', 'गोष्ट लग्नानंतरची' अशा सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे.