विकास गुप्ताच्या पार्टीला टीव्ही सेलिब्रेटींचा दिसला स्टनिंग अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 13:29 IST2018-03-15T07:59:25+5:302018-03-15T13:29:25+5:30

बिग बॉस एक्स कंटेस्टेंट विकास गुप्ताने टीव्ही इंडस्ट्रीतल्या मित्र मैत्रिणींसाठी जंगी पार्टीचे आयोजन केले होते.अभी तो पार्टी शुरू हुई ...

Vikas Gupta's party has seen the stunning style of TV celebrities | विकास गुप्ताच्या पार्टीला टीव्ही सेलिब्रेटींचा दिसला स्टनिंग अंदाज

विकास गुप्ताच्या पार्टीला टीव्ही सेलिब्रेटींचा दिसला स्टनिंग अंदाज

ग बॉस एक्स कंटेस्टेंट विकास गुप्ताने टीव्ही इंडस्ट्रीतल्या मित्र मैत्रिणींसाठी जंगी पार्टीचे आयोजन केले होते.अभी तो पार्टी शुरू हुई म्हणत टीव्हीचे अनेक सेलेब्स पार्टीला येणार म्हटल्यावर त्यांचा स्टायलिश अंदाज दिसला नाही असं शक्यच नाही.यावेळी टीव्ही सीरियल 'साथ निभाना साथिया' मधील गोपी बहू म्हणजेच देबोलीना भट्टाचार्य बोल्ड लुकमध्ये दिसली.तर 'ये है मोहब्बते' च्या इशिताने म्हणजेच दिव्यंका त्रिपाठीसुध्दा गोर्जियस लुकमध्ये पार्टीला हजर होती.यासोबतच रतन सिंह राजपूत, पूजा गौड, भाविनी पुरोहित,दीपशिखा नागपाल,आकाश ददलानी,राज सिंह अरोडा,संभावना शेठ,अविनाश व्दिवेदी, शालीन भनोट, राज अर्जुन,शक्ती आनंद,साई देओधर, रिध्दी डोगरा, काम्या पंजाबी, वरुण बडोला, राजेश्वरी सचदेवसोबत अनेक सेलेब्सनेहे पार्टीत हजेरी लावली होती.



'बिग बॉस सीजन ११' ची विजेती शिल्पा शिंदे सध्या प्रचंड व्यस्त आहे.कारण बिग बॉसच्या घराबाहेर पडलेले जवळपास सर्वच स्पर्धक एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी पार्टी करताना दिसत असताना शिल्पा मात्र यापासून दूर असल्याचे दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वी शिल्पा आणि बिग बॉसचा स्पर्धक सब्यसाचीचे काही फोटोज् सोशल मीडियावर बघावयास मिळाले. या फोटोंमध्ये शिल्पा सब्यसाचीसोबत किचनमध्ये बघावयास मिळाली होती.आता पुन्हा एकदा शिल्पाचे काही फोटोज् आणि व्हिडीओ समोर आले असून,त्यामध्ये ती मस्तीच्या मूडमध्ये दिसले होते.वास्तविक हे व्हिडीओ शिल्पाच्या एका फोटोशूटचे आहेत. व्हिडीओमध्ये शिल्पा खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पाने ब्लॅक गाउन व्यतिरिक्त गोल्डन साडी परिधान केली आहे.शिल्पाचे हे शूट माया फॅशन फोटोग्राफरने केले.बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर शिल्पाने सांगितले होते.या शोमध्ये पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा यांच्यासोबत तिचे चांगले संबंध होते.त्यामुळेच ती या दोघांना काही दिवसांपूर्वी भेटली.त्याव्यतिरिक्त तिने एकाही इतर स्पर्धकाला भेटण्यात रुची दाखविली नव्हती. 





Web Title: Vikas Gupta's party has seen the stunning style of TV celebrities